…..यामुळेच तुमच्या खात्यात जमा होत नाही गॅस सिलिंडरचे अनुदान

दर महिन्याला गॅस सिलेंडरचे दर बदलत होते त्यानुसार गॅस सिलिंडरचे अनुदान किमतीमध्ये सुद्धा दर महिन्याला बदल होत होता. साधारणपणे साडेसातशे ते आठशे रुपये किमतीच्या सिलेंडर मागे दोनशे ते दीडशे रुपये प्रमाणे अनुदान ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होत असे. परंतु केंद्र सरकारने जून 2020 पासून घरगुती गॅस सिलेंडरची आधारभूत किंमत पाचशे पर्यंत खाली आणला. त्यानंतर या स्थितीमध्ये बदल केलेला नाही. म्हणूनच या काळातला अनुदान ग्राहकांच्या बँक खात्यांमध्ये जमा दिसत नाही.

आता अनुदानित आणि विना अनुदानित स्वयंपाक गॅस सिलिंडरच्या (एलपीजी) किमती जवळपास सारख्या झाल्याने, गॅस सिलिडरचे अनुदान जमा होत नसल्याचा दावा गॅस वितरक आणि पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

खुल्या बाजारातील गॅसचा दर वाढल्यास पुन्हा अनुदान जमा होईल. अशी माहिती गॅस वितरक आणि पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जोडली.

या संदर्भात माहिती देताना इंडियन ऑईल मधील अधिकारी म्हणाले, गॅसच्या किमतीवर आंतरराष्ट्रीय इंधन दर, आयात आणि देशातील उत्पादन असे विविध घटक प्रभाव टाकतात. त्यानुसार दरमहा एलपीजी गॅसचा दर बदलत असतो. एलपीजीचे देशातील उत्पादन वाढले असून आयातही वाढली आहे. पूर्वी खुल्या बाजारात एलपीजी गॅसचा दर ७०० रुपये होता. तेव्हा अनुदानित सिलिंडर ५६० रुपयांना मिळत होता. त्यामुळे सध्या अनुदान जमा होत नाही. ही तफावत वाढल्यास पुन्हा अनुदान जमा होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here