दमदार पावसामुळे कांद्याची रोपे गेली ,बियाणांचाही तुटवडा

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यात मागील काही दिवसात चक्री वादळामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्याच्या शेतातील कांद्याची रोपे सडून खराब झाली आहेत.  त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात अनेक ठिकाणी कांदा बियाणांचा तुटवडा निर्माण झाला आहे.  तसेच ज्या दुकानदाराकडॆ बियाणे आहे ते दुप्पट दराने विकत असल्याचा आरोप देखील शेतकरी वर्गातून केला जात आहे.  
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे.  त्यामुळे शेतात  उभी असलेली सर्वच पिके मोठ्या प्रमाणात खराब झाली आहेत. 
त्यामध्ये सर्वात जास्त कांदा पिकांचे आणि रोपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतात पावसाचेपाणी  साचल्यामुळे शेतातील कांदा रोप सडून खराब झाले आहेत.  त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोपांचा  तुटवडा निर्माण झाला आहे.  नवीन रोपे लावण्यासाठी कृषी सेवा केंद्रात ठराविक जातीचे बियाणे शिल्लक नाहीत.  त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे.  तसेच ज्या कृषी सेवा केंद्रात बियाणे उपलब्ध आहेत ते दुप्पट दराने विक्री करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होताना दिसत आहेत.  तर इतर जातीचे बियाणे शिल्लक आहेत मात्र त्याची उगवण क्षमता कमी असल्याने शेतकरी हे बियाणे खरेदी करत नाही.  त्यामुळे कृषी विभागाने तसेच पंचायत समिती यांनी संलग्न निर्णय घेऊन शेतकऱ्यांना उत्कृष्ट जातीचे कांदा बियाणे उपलब्ध करून द्यावेत . तसेच जादा दराने कांदा बियाणे विकणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होताना दिसत आहे.  

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here