Breaking, ७ नोव्हेंबरला ‘मातोश्री’ वर मशाल मोर्चा

मुंबई:  मराठा आरक्षणाची सुनावणी मराठा आंदोलन आता आक्रमक झाले आहेत. मराठा आंदोलन आणि आता थेट मुख्यमंत्र्यांच्या घरी म्हणजेच मातोश्रीवर सात नोव्हेंबरला मराठा क्रांती मोर्चा कडून मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सर्वपक्षीय मराठा आमदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. त्यामुळे आता मराठा क्रांती मोर्चाच्या या निर्णयाचे काय पडसाद उमटणार, हे पाहावे लागेल.

मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची गुरुवारी मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत मातोश्रीवर मशाल मोर्चा घेऊन जाण्याचा निर्णय झाला. त्यानुसार 7 नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजता मातोश्रीच्या दिशेने मशाल मोर्चा निघेल. याशिवाय, अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील मराठा आरक्षण उपसमितीही बरखास्त करण्यात यावी, असा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला.

मराठा क्रांती मोर्चाच्या या प्रमुख मागण्या आहेत

1. मराठा समाजावर अन्याय करणारी अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली असलेली संपूर्ण उपसमिती बरखास्त करून नवीन समिती बनवली जावी. या नव्या समितीत विरोधी पक्षाचा पण समावेश करावा.
2. मराठा अरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी घटनापीठाच्या निर्मितीसाठी सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करावेत.
3. मराठा तरुणांच्या नोकऱ्या, विद्यार्थ्यांचे अ‍ॅडमिशन संरक्षित केले जावेत.

मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी शुक्रवारी पुण्यात मराठा आरक्षण परिषद होणार आहे. रेसिडन्सी क्लब येथे आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेला भाजप खासदार उदयनराजे भोसले उपस्थित राहणार आहेत. दुपारी 2 ते 5 या वेळेत ही मराठा आरक्षण परिषद पार पडेल.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here