मातृत्वाचे दातृत्व अंगी असलेली गोमाता

    राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी    
कोल्हार खुर्द  : स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, ही म्हण पूर्वीपासून मनुष्य जीवनात रुजू पडलेली आहे,  जन्म दिलेल्या आई चे दूध जरी मिळाले नही तरी गायी चे दूध पिऊन जन्माला आलेले बाळ जगू शकते म्हणूनच गायी ला गोमातेचा दर्जा मिळाला आहे, असाच प्रत्यय राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे एका शेळी ने जन्म दिलेल्या  करडांना स्तनपान करीत असलेल्या गोमातेच्या रूपाने आला आहे.        
हिंदु धर्मात गायी ला गोमाता म्हटले आहे, गोमाता म्हणण्यामागे त्रेतायुगापासूनच अनेक करणं आहेत, गायीचे दूध, गायी चे गोमूत्र आणि शेण या वस्तूंना आजच्या कलियुगात देखील अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.  गायीच्या शेणाने सारवलेल्या जमिनीवर झोपल्याने आज ही कोणत्याही प्रकारचे आजार किंवा मणका दुखी चे त्रास होत नाही.  याला कलियुगातील डॉक्टर किंवा शास्त्रज्ञांनी मान्यता दिली आहे .
देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या बळीराजा ने आपल्या शेतात रासायनिक खतांऐवजी शेणखताचा वापर केल्यास शेती सुपीक आणि उत्पादन दुप्पट असा ही एक गायीच्या शेणापासून होणारा फायदा आहे. त्यामुळे आजही ग्रामीण भागातील शेतकरी रासायनिक खतांपेक्षा शेणखताना पसंती देत आहेत.  गायी चे गोमूत्र मध्यंतरी च्या काळात आलेल्या कोरोना वर रामबाण उपाय असल्याचे ऐकले आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागात आजही पोटातील विकार नष्ट करण्यासाठी ग्रामस्थ गोमूत्राचे सेवन करतात. त्याच प्रमाणे गायीचे दूध तर आज च्या जीवनात एक जीवनावश्यक झाले आहे. 
अमेरिका फ्रांस, जर्मनी सारख्या पाश्चिमात्य देशांमध्ये तर माणसाला जिवन जगत असताना नैराश्य आले तर काही वेळ गायीच्या सहवासात राहिल्यास नैराश्य दुर होते हे देखील या लोकांनी मान्य केल्याचे आपण कलियुगात पाहत आणि ऐकत आहोत म्हणूनच कलियुगात देखील गायी ला गोमाते चा दर्जा मिळाला आहे.      
याचेच उदाहरण राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील आमचे प्रतिनिधी प्रकाश चिखले यांच्या गोठ्यात असलेल्या गायी ने दाखवून दिले  आहे.  काही दिवसापूर्वी दोन करडांना जन्म दिलेल्या शेळी ला दूध कमी असल्यामुळे या करडांना पोटभर आईचे दूध मिळत नव्हते.  अशावेळी या दोन करडांना दुधाच्या बाटली ने दूध पाजून संगोपन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
  मात्र, देव तारी त्याला कोण मारी याप्रमाणे त्यांच्याच गोठ्यात असलेल्या तीन महिण्यापुर्वी व्यालेल्या गायीच्या खाली प्रेमाने गेलेल्या दोन ही करडांना या गायी ने आपल्या वासराप्रमाणे स्तनपान करण्यास सुरुवात केली आणि या गायीच्या रूपाने या करडांना दूध पाजणारी आई मिळाली असल्यामुळे चिखले कुटुंबाची चिंता आता मिटली आहे.         
 जब गाय नही होगी, गोपाल कहा होंगे
 हम सब इस दुनिया मे खुशहाल कहा होंगे

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here