अहिल्यादेवी होळकरांचा भव्य पूर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळा

पुणे : जेजुरी गडावर लवकरच होणार लोकमाता अहिल्यादेवी होळकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा सम्पन्न. हा ब्राँझ धातूचा पुतळा शिल्पकार महेंद्र थोपटे यांनी बनविला आहे.

भारतच्या तीर्थक्षेत्र ठिकाणी आपल्या सेवाभावी धर्मनिस्ठेतून भाविकांच्या सेवे करीता ऐतिहासिक अशी अतुल्य कामगिरी मधून अजरामर झालेल्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा सर्वात मोठा भव्य असा १२ फुट पूर्णाकृती ब्रांज धातूचा पुतळा पुण्यातील कला संस्कृती कलामंदिरात शिल्पकार महेंद्र थोपटे यांच्या कलाकृतीतून  पूर्ण झाला  असून ख्यातनाम भारतीय लोकदैवत जेजुरी खंडोबा गडावर मार्तंड देवसंस्थान समितीच्या वतीने  या पुतळ्याचा लवकरच लोकार्पण सोहळा होत आहे.

या पूर्णाकृती पुतळ्याची पहाणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड तसेच मराठा सेवा संघ राष्ट्रीय अध्यक्ष  विजयकुमार ठुबे श्री मार्तंड देवसंस्थान अध्यक्ष संदीप जगताप विश्वस्थ पंकज निकुडे राजकुमार लोढा शिवराज झगडे यांनी केली यावेळी धनगर उन्नती समाज मंडळ पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश लेंडे शिवव्याख्याते निलेश जगताप  आदि मान्यवर उपस्तिथ होते या प्रसंगी   प्रसिद्ध  शिल्पकार महेंद्र थोपटे यांचा सन्मान उपस्तिथ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला  यावेळी.  

गडाच्या पायरीमार्गावर पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा  पूर्णाकृती पुतळा साकारणे हे त्यांच्या धर्मनिष्ठतेचा गौरव असून राज्यातून देवदर्शनासाठी येणाऱ्या  भाविकांसाठी पर्वणीच  आहे .असे प्रतिपादन प्रवीण  गायकवाड यांनी केले. आपल्या घराण्याचे कुलदैवत असल्या कारणाने आणि लोकसेवेच्या दृष्टीकोनातून इतिहास प्रसिद्ध सरदार मल्हारराव होळकर आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी जेजुरीगड आणि परिसरात  धर्मशाळा  तलाव निर्मिती विकास कार्यात आपल्या  कार्याचा अजरामर असा ठसा उमटवला आहे.

त्यांच्या कार्यातून लोकसेवा आणि समाजभिमुख कार्याची धार्मिक अध्यात्मिक प्रेरणा पहाता त्यांच्या महान कार्याच्या स्मृतींना उजाळा मिळावा म्हणून या पुतळ्याची निर्मिती ट्रस्टच्या माध्यामतून केली जात असल्याची माहिती विश्वस्थ पंकज निकुडे यांनी दिली काहीही असो जेजुरी गडावरील  राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या या भव्य प्रतिकृती प्रतिमा निर्मिती मुळे मात्र  जेजुरीगडावर त्यांच्या भक्ती शक्ती आणि लोकसेवेचे दर्शन मात्र झाल्या शिवाय राहणार नाही       

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here