पित्याने चिमुकलीचा खून करून केली आत्महत्या

राहुरी: तालुक्यातील दवणगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून आपल्या ३ वर्ष वयाच्या मुलीचा तोंड दाबून खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, दवणगाव येथील अनिल दिनकर पाळंदे(वय-४७) याने गुरुवारी रात्री ११ वाजेनंतर स्वतःच्या तीन वर्षांच्या आदीरा अनिल पाळंदे हिच्या तोंडावर उशी दाबून तिचा जागीच खून केला. त्यानंतर अनिल याने घराच्या छताला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

याबाबत घटनास्थळी चौकशी केली असता अनिल याच्यावर सहकारी संस्थांचे कर्ज होते. अतिवृष्टीमुळे हाता-तोंडाशी आलेले पिके वाया गेली. शेतीतून उत्पन्न न मिळाल्याने कर्ज कसे फेडायचे . पुढील पिके कशी उभी करायची या विवंचनेतून त्याने गुरुवारी रात्री ११ वाजेच्या नंतर चिमुकल्या मुलीचा खून करून स्वतः आत्महत्या केली. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी अनिल यास दुसरी मुलगी झाली असून त्याची पत्नी ही बाळंपणासाठी माहेरी गेलेली होती.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here