अमेरिकेतही शरद पवारांचे फॉलोवर्स

नवी दिल्ली – निवडणुकीच्या काळात साताऱ्यातील गाजलेली शरद पवारांची पावसात झालेली सभा आजही चर्चेचा विषय आहे. याच सभेमुळे शरद पवारांना अजूनच प्रसिद्धी मिळाली होती. कदाचित या गोष्टीचे अनुकरण करत अशीच एक सभा आता अमेरिकेत देखील नुकतीच पार पडली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाकडून जो बाइडेन यांची पावसातील सभा चांगलीच गाजत आहे.

या निवडणुकीत अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आणि माजी उपाध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन उभे आहेत. नुकताच दोन्ही नेत्यांच्या फ्लोरिडामध्ये सभा झाल्या.

रिपब्लिकन पक्षाचे सरकार पुन्हा आणण्यासाठी फ्लोरिडा राज्य महत्त्वाचे आहे. तर ट्रम्प यांना धक्का देण्यासाठी बायडन यांनी फ्लोरिडात विशेष जोर लावला आहे. बायडन यांच्या भाषणावेळी वादळी पाऊस झाला. मात्र या पावसातही बायडन यांनी भाषण चालू ठेवले.

बायडन यांची रॅली ड्राईव्ह इन होती. गर्दी जमून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी समर्थकांना कार घेऊन रॅलीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही सभा झाल्यानंतर बायडन अधीकच चर्चेत आले आहेत. या भाषणानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना पावसात केस ओले होण्याची भीती वाटते पण बायडन यांना तशी भीती वाटत नाही अशा प्रकारचे ट्विट्स पाहायला मिळाले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here