कलाकारांवर उपासमारीची वेळ, तर आर्टिस्ट कार्ड च्या नावाने होते फसवणूक…

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी

शिर्डी : कोरोनाच्या पार्श्चभुमीवर केंद्र व राज्य सरकारने लोकडाऊन जाहीर केले आणी सिने कलाकारांचे काम बंद पडले. त्यांचा उदारनिर्वाहचे साधन बंद झाल्याने अनेक कलाकारांवर उपासमारीची वेळ आली, अनेकांना दारोदार भटकंती करावी लागली. पण कोणीही त्यांच्या मदतीला धावून आले नाही.

जो कलाकार प्रसारमाध्यमाच्या माध्यमातुन लोकांचे मनोरंजन करतो. आज लॉकडावून मध्येही त्यांची करमनूक करतो तर त्याच्यावर ही वेळ आल्याचे चित्रपट दिग्दर्शक तथा महाराष्ट्र प्रदेश सचिव  गोरख भारसाखळे यांनी सांगीतले. राज्य शासनाने जरी आज चित्रीकरणास परवानगी दिली असली , तरी कलाकारांना कोठेही काम मिळत नाही. किंवा खुप कमी मानधनावर काम करावे लागत आहे. सिनियर कलारांना तर मानधनाआभावी जमावाचे काम करावे लागत आहे.

लॉकडावून मध्ये तर अनेकांनी उपासमारीच्या पोटी आत्महात्या सुद्धा केल्या याची कोठेही शासन दरबारी नोंद नाही. तर अविरत काम करून लोकांचे मनोरंजन करणाऱ्या आशा सिने कलाकारांना कुठलेही मदत केली नाही. तसेच एखाद्या कलाकाराचा चित्रीकरणा दरम्यान आपघात झाला तर त्याचा कसलाही विमा उतरविला जात नाही, म्हणून त्याला मदतही मिळत नाही.

समाजातल्या सर्व घटकांना शासन दरबारी न्याय मिळतो मग कलाकारांनाच का नाही मिळत? सिने क्षेत्रात अनेक संघटना आहेत पण् त्या फक्त ‘आर्टीस्ट कार्ड’ च्या माध्यमातुन कलाकारांची आर्थीक फसवणूक करतात पण् न्याय देयाची वेळ आली तर माघार घेतात.

एखादा कलाकार वयोवृध्द झाल्यावर त्याला कुठल्याही प्रकारचे मानधन आथवा पेंशन मिळत नाही. मग कलाकारांनी आपली कला जोपासवी की नाही हा प्रश्न कलाकारांना पडत आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here