माजी मंत्री गिरीश महाजन यांना शिवीगाळ; गाडीवर दगडफेक

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी

जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे दरम्यान जळगाव येथील भाजपाच्या कार्यालयात बैठकीदरम्यान एका भाजपा कार्यकर्त्याने वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांना शिवीगाळ केली तसेच एका गाडीवर दगडफेक केली. या घटनेची खबर कळताच पोलिसांनी भाजपाच्या कार्यालयाकडे धाव घेतली. शुक्रवारी रात्री हा धक्कादायक प्रकार घडला मात्र, अद्याप या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

जळगाव भाजपाच्या कार्यालयात शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. बैठकीनंतर गिरीश महाजन पदाधिकाऱ्यांसह कार्यालयातून बाहेर पडले. यावेळी एका कार्यकर्त्याने महाजन यांना शिवीगाळ सुरु केली. त्याने हातात दगड घेऊन तो एका कारवर देखील भिरकावला. मात्र, अचानक घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ माजली.

नगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी प्रकरणावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला. हल्ला करणारी व्यक्ती भाजपाचा कार्यकर्त्या नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.  संबंधित व्यक्ती मनोरुग्ण व मद्यपी आहे. त्याचा भाजपशी काही संबंध नाही पण शुक्रवारी रात्री बैठकीवेळी तो अचानक कार्यालयात आला होता, असा खुलासा त्यांनी केला आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here