भाजपा पदाधिकारी निवडीचा वाद चव्हाट्यावर

२१३ बुथ प्रमुखांसह ४४ केद्राध्यक्षांचे सामुहिक राजीनामे

श्रीरामपूर तालुका व शहर भाजपा संचलन समिती स्थापन

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी

श्रीरामपूर : तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या निवडी वादात सापडल्या असून, आपल्याला विश्वासात न घेता पदाधिकारी नियुक्त केल्याबद्दल श्रीरामपूर तालुक्यातील २३१ बूथ प्रमुखांपैकी २१३ जणांनी तर ५१ शक्ती केंद्राध्यक्षापैकी ४४ जणांनी आपल्या पदाचे सामुहिक राजीनामे देऊन श्रीरामपूर तालुका व शहर भारतीय जनता पार्टी संचलन समिती स्थापन करण्यात आल्याने पक्षांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहे. आता यावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे.

बुथ प्रमुख म्हणजेच स्थानिय समिती अध्यक्षांमधून मंडलाध्यक्ष निवडण्यात येईल, असे पक्षाच्या घटनेत अधिकृतपणे स्पष्ट
करण्यात आले आहे.

याबाबत या सर्व बुथप्रमुखांसह शनिवारी सायंकाळी येथील स्वयंवर मंगल कार्यालयात शक्ती प्रदर्शन करीत पत्रकारांशी संवाद साधला, श्रीरामपूर भाजपाचे नगरसेवक किरण लुणिया,रवी पाटील,राजेंद्र चव्हाण,अभिजित कुलकर्णी, प्रमोद भारत,संजय यादव,सचिन ढोबळे, नारायण पिंजारी,बाळासाहेब हिवराळे,सचिन पारेख,संदीप वाघमारे,शेखर आहेर,सुरेश आसने, गणेश भिसे,सोमनाथ पतंगे,सोमनाथ कदम आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी खुलासा करताना, या समितीच्या बुथ प्रमुखालाच त्या समितीच्या अध्यक्षाचे घटनात्मक पद देण्यात आले.

बुथ प्रमुखांना अधिकृतपणे मंडलाध्यक्ष निवडीचा अधिकार पक्षाच्या घटनेत देण्यात आला आहे. अशा मुलभूत घटनादत्त अधिकारालाच हरताळ फासून प्रत्यक्ष काम करणाऱ्या संघटनेला कटकारस्थान करुन, वरिष्ठांची दिशाभूल करुन अत्यंत कावेबाजपणे संपविण्याचा प्रयत्न केला गेला.

बुथप्रमुखांना असलेल्या मंडलाध्यक्ष निवडीच्या अधिकारामध्ये श्रीरामपूर शहरातील बुथ प्रमुखांनी स्वत: च्या सहीनिशी पत्र देवून शहराध्यक्ष पदासाठी अभिजीत कुलकर्णी यांचे व तालुक्यातील बुथ प्रमुखांनी तालुकाध्यक्ष पदासाठी मदन चौधरी यांचे नाव सुचविले होते. त्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करुन बुथ प्रमुखांची मते डावलून श्रीरामपूर शहर अध्यक्षपदी मारुती बिंगले व तालुका अध्यक्षपदी बबन मुठे यांच्या नियुक्त्या केल्या गेल्या. या नियुक्त्यांचा निषेध म्हणून बुथ प्रमुखानी बुथ प्रमुख पदाचे राजीनामे दिले आहेत.

दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना सर्व बुथ प्रमुखांनी आपली ओळख सांगून राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी निषेध म्हणून काळ्या फिती लावल्या होत्या, तर सर्वत्र काळे झेंडेही लावण्यात आले होते.

3 COMMENTS

  1. I have to point out my passion for your generosity supporting persons who really need guidance on this one situation. Your real commitment to passing the message all through ended up being pretty important and have continuously enabled regular people just like me to achieve their endeavors. Your amazing helpful instruction means this much to me and even further to my peers. With thanks; from all of us.

  2. Thanks for sharing superb informations. Your site is so cool. I am impressed by the details that you have on this site. It reveals how nicely you perceive this subject. Bookmarked this website page, will come back for more articles. You, my pal, ROCK! I found just the information I already searched everywhere and just couldn’t come across. What a great site.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here