अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या राज्य सरकारचा निषेध


समीर ठक्कर ला दिलेली वागणूक,सराईत गुन्हेगारा प्रमाणे
  

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी परतूर :  समीर ठक्कर या युवकाने राज्य सरकार च्या कारभारावर टिपणी करणारे ट्विट केले. त्यावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. हा सरळ युवकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घालाच सरकारने घातला आहे. सरकारच्या या कृती चा आपण जाहिर निषेध करीत असल्याचे  भाजयूमो प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी म्हंटले आहे.   

ते राज्य सरकारच्या कारभारा विरोधात ट्विट करणारा युवक समीर ठक्कर यांना सराईत गुन्हेगारा प्रमाणे वागणूक देणाऱ्या राज्य सरकार विरोधात  भाजयुमो  प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या सूचनेवरून परतूर येथे भाजयुमो च्या वतीने नोंदवण्यात आलेल्या निषेध सभे प्रसंगी बोलत होते. पुढे बोलतांना राहुल लोणीकर म्हणाले की, समिर ठक्कर च्या वक्तव्याला आमचे समर्थन नाही. त्याला दोषी ठरवायचा निर्णय माननीय न्यायालय घेईल. पण ज्या प्रकारे त्याला न्यायालयात नेताना एखाद्या सराईत गुन्हेगार, अतिरेक्या प्रमाणे वागणूक देण्यात आली. ते अतिशय चुकीचे आणि निंदनीय आहे.

असे सांगतानाच सरकार ची ही कृती युवा वर्गा मध्ये चीड आणणारी असल्याचे ते म्हणाले या वेळी राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वात  भाजपा चे जेष्ठ नेते भगवान मोरे ,भाजपा ता. अध्यक्ष रमेश भापकर भाजपा जिल्हा सरचिटणीस संपत टकले, तालुका सरचिटणीस रवी सोळंके, नगरसेवक प्रकाश चव्हाण, नगरसेवक कृष्णा आरगडे , नगरसेवक प्रवीण सातोनकर यांच्यासह युमो कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकार चा निषेध केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here