कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वसमावेशक दक्षता समिती स्थापन करणार – चव्हाण

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी

लिंपणगाव : श्रीगोंदा तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव समजल्या जाणाऱ्या लिंपणगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर  गुन्हेगारी सह दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामध्ये गावाला सध्या प्रशासक असल्यामुळे सरपंच व सदस्य  यांनी पाठ फिरवल्याचे प्रत्यक्षदर्शीनी दिसून येत आहे.

अशा पार्श्वभूमीत काही विघ्नसंतोषी मंडळी गाव परिसरामध्ये दहशत व गुन्हेगारीचे स्वरूप गावामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहे. ही बाब निश्चितच भविष्याच्या दृष्टीने घातक स्वरूपाची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर आपण स्वतः पुढाकार घेऊन  गावात शांतता प्रस्थापित  कशी होईल. याकडे लक्ष देणार असून, लवकरच दोन दिवसांमध्ये संपूर्ण गाव दहशत मुक्त करण्यासाठी गाव बचाव दक्षता समिती स्थापन करण्याचा निर्णय घेणार आहोत. अशी माहिती  माजी हेड कॉन्स्टेबल प्रकाश चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
         

गावच्या विविध प्रश्नासंदर्भात पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले की, लिंपणगाव हे सहा वाड्या व गाव असा एकत्रितरीत्या गावचा कारभार गेल्या शतकापासून सुरू आहे. यापूर्वी अनेक ज्येष्ठ मंडळींनी गाव वाड्या वस्त्या वरील कार्यकर्ते एकत्रित येऊन गावच्या विकासाची  बैठक घेत असत. गावची निवडणूक न घेता ज्येष्ठ मंडळी सांगतील तो सरपंच निवडला जात असत.  कोणाची वैयक्तिक भांडणे हे या बैठकीत जागेवरच सामोपचाराने मिटवत असत. ही मोठी जमेची बाजू त्याकाळी दिसून यायची गावची यात्रा म्हटली तर या यात्रेत एक सर्वसमावेशक वातावरण असायचे कुठल्याही प्रकारची हेवेदावे मनामध्ये न ठेवता गावातील कोणतेही धार्मिक कार्यक्रम असो त्या कार्यक्रमांमध्ये सर्वांचा सहभाग असायचा.

अशीही जाणकार मंडळी या गावच्या ग्रुप ग्रामपंचायतीमार्फत तनमनधनाने गावच्या विकासासाठी एकत्र येत होती. तोच विचार डोळ्यासमोर ठेवून गावातील काही निवृत्त सनदी अधिकारी, माजी सरपंच, माजी चेअरमन, समाजसेवक व ज्येष्ठ पत्रकार हे गावच्या सर्वांगीण विकासासाठी निस्वार्थपणे योगदान देत आहेत .ही बाब निश्चितच गावाच्या दृष्टीने आनंददायी व प्रेरणादायी म्हणावी लागेल.           

यासाठी विविध संघटना, प्रतिष्ठित नागरिक या सर्वांना एकत्रित करून गावचे हित साधण्यासाठी सर्वसमावेशक दक्षता समिती स्थापन करणार आहे.             

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here