कुकाण्याचा गौरव धूत आरबीआयच्या परीक्षेत यशस्वी

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी

कुकाणा : आर बी आय कडून घेण्यात आलेल्या परीक्षेत कुकण्याचे गौरव धूत याची निवड झाली आहे. यापरिक्षेत तब्बल 3 लाख विद्यार्थी सहभागी झाले होते त्यातून काही जणांना यश मिळाले. यात कुकाण्यातील स्व. सोमनाथ धूत यांचे चिरंजीव गौरव धूत यांची निवड झाली हे कुकणा गावासाठी अभिमानाची बाब आहे.

गौरव यांना सहा महिन्याच्या प्रशिक्षणा नंतर नियुक्ती देण्यात येणार आहे. या बद्दल कुकाणा ग्रामस्थांच्या वतीने सोशल डिस्टंसिंगचे पालन करत नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी अध्यक्ष पदावरुन बोलताना आ.पांडुरंग अभंग यांनी भविष्यात ग्रामीण भागातील युवकांनी देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करुन स्वतःच्या कुटुंबाचे व गावाचे नाव उज्वल करावी असा आशावाद व्यक्त केला. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, अँड देसाई देशमुख, निर्मलाताई मालपाणी, दिलीपराव लांडे, सुभाष भंडारी, आंबादास गारुडकर, शिवाजी महाराज देशमुख, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे आदि मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून  व्यासपिठावर उपस्थित होते.

कुकाणा परिसरातील विविध संघटना व युवक मंडळाकडून गौरवचा सत्कार करण्यात आला. मा.सरपंच एकनाथ कावरे,मा.उपसभापती अशोक मंडलिक, कृषी उत्पन्न बा.समितीचे उपसभापती वसंतराव देशमुख, इंजिनियर बाळासाहेब कचरे, ,समता पतसंस्थेचे चेअरमन विठ्ठल अभंग,अशोक चौधरी ,अँड गणेश निकम, उपसरपंच भाऊसाहेब फोलाणे, राजमाता पतसंस्था चेअरमन डाँ.संतोष तागड,रामधन धूत, प्रविण चोरबेले,अश्वमेध क्लबचे प्रा.कुलदीप देशमुख, विलास गुगळे आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रा.बाळकृष्ण धूत यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here