पडला त्याच ठिकाणी नदीपात्रात सापडला इसाकचा मृतदेह

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी

पारनेर : तालुक्यामधील निघोज कुंड येथील कुकडी नदीपात्रात पाय घसरून पडलेल्या इसाक रहेमान तांबोळी या रिक्षाचालकाचा मृतदेह तब्बल ११ दिवसानंतर ज्या ठिकाणी पडला  होता त्याच ठिकाणी शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कपारीमधे आढळून आला.
    इसाक रहेमान तांबोळी वय वर्ष ३५ राहणार रांजणगांव गणपती (ता.शिरुर,जि.पुणे) येथील सदर तरुण त्याची रिक्षा क्र. एम एच १२ क्यु आर ७१२६ मधून दि. २० ऑक्टोबरला दुपारी स्थानिक रहीवासी उषा सुरेश जगदाळे यांचे भाडे घेउन पारनेर तालुक्या मधील जवळे येथे गेला होता. जवळे येथे जगदाळे यांच्या मुलीला नवरात्र उपवासाचे पदार्थ देउन या महिला त्याच रिक्षाने पुन्हा रांजणगांव गणपतीकडे जात असताना, निघोज येथील मळगंगा देवीचे दर्शन घेउन नगर / पुणे जिल्हयाच्या सरहददीवर असलेल्या कुकडी नदीच्या तिरावरील निघोज कुंडावर दर्शन घेण्यासाठी या महिला थांबल्या. महीला दर्शन घेण्यासाठी गेल्यावर इसाक हा सायंकाळी साडे पाचच्या दरम्यान  कुकडी नदीपात्रात हापपाय धुण्यासाठी गेला होता. मात्र शेवाळलेल्या जागेमुळे इसाक पाय घसरून पाण्यात पडला. यावेळी पर्यटनासाठी आलेल्या नागरीकांनी इसाक पाण्यात पडल्याचे पाहिले आणि जोरजोराने आरडाओरडा करून त्यास मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत इसाक दिसेनासा झाला.

तत्काळ पारनेर व निघोज पोलिस स्टेशनला सदर घटनेची माहीती देण्यात आली.  देवदर्शनावरून आलेल्या महिलांना इसाक पाण्यात पडल्याची माहीती समजल्यावर लागलीच, त्यांनी इसाकच्या नातेवाईकांना फोनद्वारे माहीती कळविली. इसाकचे नातेवाईकांनीही घटनास्थळावर येवुन खुप शोधाशोध केली मात्र इसाक सापडला नाही. घटना समजताच पारनेरचे  पोलिस निरीक्षक राजेश गवळी, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, सहकारी पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले. रात्री उशिरापर्यंत इसाकचा पोलिस आणि नातेवाईकांनी शोध घेतला, मात्र तो सापडला नाही.

तब्बल ११ दिवसांच्या प्रदिर्घ कालावधीनंतर इसाक कुकडीच्या कपारीमधे आढळला

दोनतिन दिवस उलटले तरी इसाक याचा शोध लागला नाही. नदीपात्रात आलेला मोठा पुर, पाण्याच्या प्रवाहाचा प्रचंड वेग तसेच रांजणखळगे व त्यातील कपा-यांमुळे इसाक याचा शोध घेणे मुश्कील झाले होते. स्थानिक आदीवासी तरुणांनी  टयुबवर बसून, लोखंडी गळाच्या मदतीने कुंडांमध्ये इसाकचा भरपूर शोध घेतला. परंतू पोलिस तसेच नातेवाईकांच्या सर्व प्रयत्नांना यश आले नाही. अखेर प्रयत्नांची पराकाष्टा केल्यानंतर शोध मोहिम थांबविण्यात आली.

त्यानंतर नदीपात्राजवळ इसाकचा शोध व्हावा या उद्देशाने काही व्यक्तींची नेमणूक करण्यात आली.  शुक्रवारी बारा वाजण्याच्या सुमारास नदीपात्राजवळ नेमलेल्या व्यक्तींना इसाक याचा मृतदेह आढळून आला. मात्र या गोष्टीला तब्बल ११ दिवस लोटले होते. पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांना माहीती दिल्यानंतर मृतदेह नदीपात्रातून वर काढण्यात आला.

पाऊस थांबल्याने नदीपात्रातील पाणी कमी झाले होते. त्यामुळेच इसाक जेथे पडला तेथेच तो कपारीमध्ये अडकुन बसल्याचे समजते.पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी स्थानिक तरूणांच्या मदतीने इसाक याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. तब्बल ११ दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर इसाकचा मृतदेह सापडल्यामुळे पोलीस व नागरीकांनी सुटकेचा श्वास सोडला. घटनास्थळावरच पारनेर ग्रामिण रुग्णालयाचे डाॅ.बागल यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह मृताच्या नातेवाईकांना देण्यात आला. पारनेरचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, पोलीस काँन्स्टेबल दत्ता चौगुले,रविंद्र पाचारणे, हवालदार विलास लोणारे,गुजर यांनी तपासकामी सहकार्य केले.

इसाकच्या वडिलांचा मृत्यू
मुलगा अचानक नदीपत्रात पडला आणि खूप शोध घेऊन ही मुलगा इसाक सापडत नसल्याने इसाकच्या काळजीने वडील रहेमान यांचेही ह्रदयविकाराच्या तिव्र धक्क्याने गुरुवारी सायंकाळी ५ वाजता निधन झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here