सैन्यदलाच्या भरतीत ३० तरुणांना लाखोंचा गंडा; राज्यस्थानच्या एजंटसह लिपिकाला पुण्यात अटक

पुणे: भारतीय सैन्यदलाच्या परीक्षेत पास करून देतो, असं सांगून अनेक तरुणांना गंडवणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात राजस्थानच्या एजंटसह सैन्यदलातील एका लिपिकाला अटक करण्यात आली आहे.

फेब्रुवारीत शारीरिक चाचणी घेतल्यानंतर रविवारी वानवडीच्या एआयपीटीच्या मैदानावर लेखी परीक्षा झाली. लेखी परीक्षेत पास करून देतो असं सांगून आरोपींनी 30 उमेदवारांकडून 3 ते 4 लाख घेतल्याचं निष्पन्न झालं आहे. या प्रकरणी वानवडी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र राठोड (एजंट, राजस्थान) आणि जयदेव सिंह परिहार ( लिपिक, रिक्रुटमेंट ऑफिस ) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावं आहेत. वानवडी येथे होणाऱ्या भरतीच्या लेखी परीक्षेत पास करून देण्याचं आमिष दाखवून 30 उमेदवारांची लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार होणार असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सैन्यदलातील दोन कर्मचाऱ्यांना अटक केली. आरोपींनी पोलीस चौकशी गुन्हा कबूल केला आहे.

त्यानुसार, आरोपी जयदेव सिंह परिहार याने कॅम्प येथील कार्यालयात परीक्षेचे हॉल तिकीट घेण्यास आलेल्या काहींना आपल्या जाळ्यात ओढलं. आपली सैन्यदलातील मोठ्या अधिकाऱ्यांशी ओळख आहे. लेखी परीक्षेत मी तुम्हाला पास करून देतो. तुमचं काम झाल्यावर प्रत्येकी एक ते दोन लाख द्या, असं सांगून जयदेव सिंह परिहार यांनं 30 उमेदवारांचे मूळ कागदपत्र स्वत: च्या ताब्यात घेतले होते.

एवढंच नाही तर गेल्या 15 दिवसांपासून लोहगाव येथे एक शिक्षक नियुक्त करून उमेदवारांचे क्लास घेण्यात येत होते, अशी धक्कादायक माहिती चौकशीत समोर आली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चनसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन व युनिट पाच या पथकांसह आर्मी इंटेलिजन्सचे आधिकारी व स्टाफ यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here