Fraud: प्रेमात अडकवून तरुणींचे व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकणारा जेरबंद; अनेक व्हिडीओ टाकून केली हजारो डॉलरची कमाई

मुंबई: नोकरीचं आमिष दाखवून महिला, तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकून त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्या ठाणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्टच्या कंडक्टरला मुंबई पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्या भूलथापांना बळी पडलेल्या तरुणींचे व्हिडिओ पॉर्न वेबसाइटवर अपलोड करत त्याने आतापर्यंत हजारो डॉलर कमावले असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले. 

मिलिंद झाडे असं आरोपीचं नाव असून तो ठाणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्टमध्ये (टीएमटी) बस कंडक्टर म्हणून कार्यरत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मिलिंद झाडे यानं ‘शिव वैशाली’ नावाची एक वेबसाइट सुरू केली होती. त्यावर तो पॉर्न कंटेंट अपलोड करत होता. एवढंच नाही तर पॉर्न व्हिडिओ पाहण्यासाठी तो इंटरनेट यूजर्स कडून डॉलर स्वरूपात चार्ज  आकारत होता. क्राईम ब्रांचला या वेबसाइटवर अनेक तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडिओ आढळून आले आहेत.

पीडित तरुणींपैकी एक असलेली पिझ्झा स्टोअरमध्ये काम करणाऱ्या तरुणीला लाखो रुपयांची नोकरी देण्याचे आमिष दाखवून आरोपीने शारिरीक संबंध बनवले. नंतर तिचा व्हिडिओ वेबसाइटवर अपलोड केला. हा व्हिडिओ तरुणीच्या एका नातलगाने पाहिला आणि त्यानंतर हे प्रकरण उघडीस आलं.

आरोपी कंडक्टरविरोधात विक्रमगड पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी तपास करत असताना अजून काही तरुणींचे आरोपीने लैंगिक शोषण केल्याचे गुन्हे शाखेला समजले. यानंतर दुसऱ्या एका तरुणीने वालीव पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here