श्री रेणुका व श्री मायाक्का देवी दर्शनावर महिनाभर निर्बंध

बेळगाव / प्रतिनिधी

कर्नाटकसह महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गोवा आदी राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे बेळगाव जिल्ह्यातील श्री रेणुका देवी व श्री मायाक्का देवी दर्शनावर पुन्हा महिणा भर निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे देवीच्या दर्शनासाठी भाविकांना आणखी महिनाभर वाट पहावी लागणार आहे.

कोरोनाच्या संकटामुळे पूर्व खबरदारी म्हणून आणि भाविक व नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने बेळगाव चे जिल्हाधिकारी एम. एस. हिरेमठ यांनी सौंदत्ती श्री रेणुका देवी आणि रायबाग तालुक्यातील चिंचली येथील श्री मायाक्का देवी मंदिराचे दरवाजे महिनाभर बंद ठेवण्यात येणार आहेत. यामुळे देवीच्या भक्तांना पुन्हा निराश व्हावे लागले आहे.

कोरोनामुळे 22 मार्चपासून आदिशक्ति श्री रेणुका देवी आणि श्री मायाक्का देवी ची मंदिरे गेल्या आठ महिन्यापासून बंद आहेत. यामुळे कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गोवा आदी राज्यातील लाखो देवी भक्तांना मंदिराची दरवाजे कधी उघडतील आणि देवी दर्शन कधी होईल? यांची आस लागून राहिली होती. नोव्हेंबर पासून दर्शनासाठी ही मंदिरे खुली करण्यात येतील, अशी आशा भाविकातून व्यक्त होत होती, मात्र कोरोनाचे संकट अध्यापही टळले नसल्याने जिल्हा प्रशासन आणि मंदिर प्रशासनाच्या वतीने ही मंदिरे पुन्हा महिनाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र दैनंदिन पूजा अर्चा व कार्यक्रम प्रशासनाच्या वतीने होणार असल्याचे श्री रेणुका देवी मंदिर प्रशासनाचे सीईओ रवी कोटारगस्ती यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here