एकलहरे गुटखा प्रकरणाचा तपास संपूर्ण थंडावला…

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी

श्रीरामपूर : संपूर्ण जिल्ह्यातील लक्षवेधी ठरलेल्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या गुटखा छापा प्रकरणाचा तपास संपूर्ण थंडावला आहे. अजूनही मोठमोठे रहस्य गुलदस्त्यातच आहेत. पोलीस प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याचे बोलले जात आहे. श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे कार्यक्षेत्रातील आठवाडी शिवारात गुलाबाच्या बागेलगद असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये पोलीस यंत्रणेने प्रथमतः 54 लाखांचा  गुटखा साठा जप्त केला पुन्हा दोन दिवसानंतर याच भागातील एका बंद खोलीत गुटखा असल्याची माहिती  पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना मिळाली होती.

पोलीस पथकाने त्या बंद खोलीतुन 11 लाख 66 हजारांचा गुटखा सुगंधी तंबाखू पुन्हा जप्त केली. परिसरात दोन वेगवेगळे छापे पडले पहिल्या ठिकाणी जो अवैध गुटखा सापडला त्या ठिकाणच्या मालकाचा शोध पोलीस यंत्रणेला एका आठवड्यानंतर लागला तर दुसऱ्या ठिकाणी छापा मारला त्या मालकाचा शोध अर्धा महिना लोटूनही लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. राज्यात गुटखा विक्री, साठा, वाहतूक, वितरण आणि उत्पादन यावर अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन मुंबई यांच्या १५ जुलै २०१४ च्या अधिसुचनेद्वारे प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्याचप्रमाणे देशातही तंबाखू मिश्रीत गुटखा विक्रीस बंदी आहे. मात्र, अशाही परिस्थितीत चोरट्या मार्गाने गुटख्याची विक्री, साठा, वाहतूक, वितरण  सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव एकलहरेतील आठवाडीत समोर आले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी दिवसरात्र एक करून संपूर्ण  गुटखा रॅकेट उध्वस्त केले. मात्र मूळ गुटखा किंग पर्यन्त पोहचणार तोच त्यांच्याकडून या प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आला व शिर्डी येथील पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्याकडे सोपविण्यात आला. 

पोलिस प्रशासन स्थानिक गुटखा किंग पासून अद्यापही दूरच..! 

संजय सातव यांनी या गुटखा प्रकरणात संपूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. एक आठवडा उलटूनही संजय सातव यांनी छापा ठिकाणच्या जागेची पाहणी सुद्धा केली नसून तपास तर दूरच राहिला असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. या गुटखा छाप्यातील मुख्य सुत्रधार अजूनही मोकाट असल्याने  पकडण्यात आलेल्या आरोपींनी पोलिस प्रशासनाला तपासणीच्या वेगवेगळ्या दिशेत नेऊन एकलहरेतील गुटखा किंग अर्थात मुख्य सुत्रधाराला बाजूला सावरून, आपल्या धंद्यातील प्रतिस्पर्ध्यांवर निशाणा साधण्याचे काम केले. त्यामुळे एकलहरेतील गुटखा किंग अजूनही मोकटच असल्याचे किरकोळ गुटखा व्यापाऱ्यांसह परिसरातील सुज्ञ नागरिकांमधून बोलले जात आहे. एकलहरेतील गुटखा छापा सुरुवातीपासून ते अद्यापपर्यंत  संशयाच्या भोवर्‍यात अडकला होता. या गुटखा छाप्यातील ठिकाण मालकाला पोलीस प्रशासन वाचविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

पोलिसांनी  गुटखा छाप्यातील ठिकाणच्या जागेशी गुन्ह्यातील आरोपीचा काहीही संबंध नसलेल्या एका पंटरवर गुन्हा दाखल केल्याचे बोलले जात आहे. ज्या ठिकाणी हा अवैध व्यवसाय चालू होता त्या पत्र्याचे शेड व जागा मालकासह दुसऱ्या छापा ठिकाणच्या मालकाचा शोध तर अजूनही पोलीस यंत्रणेला लागलेला नसून अनेक रहस्य गुलदस्त्यातच आहे. याबाबद संजय सातव यांनी संपूर्ण सखोल चौकशी करून संबंधित स्थानिक गुटखा किंगवर गुन्हा दाखल करणे आवश्यक होते, मात्र पोलिसांना या सम्पूर्ण प्रकरणाचा संपूर्ण विसरच पडलेला दिसून येत आहे.

अनेक रहस्य गुलदस्त्यातच.?

पोलिसांनी ज्या ठिकाणी छापा टाकला होता त्या ठिकाणच्या जागेचे उतारे तपासून मूळ मालकाचा शोध घेणे गरजेचे आहे, त्यानुसार कारवाई आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.  तालुक्यातील आतापर्यंतची गुटखा प्रकरणाची पोलिसांनी केलीली इतक्या मोठ्या कारवाईत पोलिसांनी छापा ठिकाणच्या मालकाला  जाणूनबुजून दुर्लक्ष केले का ?  एकलहरेच्या अस्सल गुटखा किंगला पोलिस जाणूनबुजून दुर्लक्ष करीत तर नाही ना ? अशे एकनाऐक चर्चेला जिल्ह्यात उधाण आले आहे.

एकलहरेचा अस्सल गुटखा किंग कोण?

एकलहरे येथील झालेल्या या गुटख्या छाप्यातील ठिकाणी गेल्या सहा महिन्यापासून गुटखा साठवणूक करून स्थानिक किरकोळ व्यापाऱ्यांना दिला जात असे. सदर गुटखा कनेक्शन संगमनेर मधून असल्याचे समजले आहे, तो कोल्हार मार्गे याठिकाणी येत असे. या प्रकरणी पोलिसांनी अस्सल गुटखा किंगला उजेडात आणलेले नाही. एकलहरेचे अस्सल गुटखा किंगला गजाआड करण्यात अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांना यश येईल का ? एकलहरेच्या अस्सल गुटखा किंगचा पर्दापाश करण्याची मागणी येथील विविध सामाजिक संघटनांनी केली असून, अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here