Home Health तालुक्यात अवैध दारू विक्री जोमात

तालुक्यात अवैध दारू विक्री जोमात

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी

श्रीगोंदा :  तालुक्यातील गावोगावी बंदी असलेला गुटखा राजरोस पणे विक्री होत असताना या खालोखाल अवैध दारू धंद्याने देखील डोके वर काढले आहे. केवळ स्थानिक गुन्हे शाखेचे पथकापासून स्थानिक पोलीसांपर्यंतचे अधिकारी आणि पथक हे वारंवार कारवाईसाठी जात असले तरी तालुक्यातील अनधिकृतपणे हॉटेल ,ढाबा यावर विक्री होणारी देशी विदेशी दारू बंद होत नाही. त्यामुळे अवैध व्यवसाय करणार्‍यांना प्रशासनाचा धाक आणि वचक राहिला नसल्याचे स्पष्ट होत आहे.
                                                            श्रीगोंदा तालुक्याचा विस्तार मोठा असल्याने 2012 साली श्रीगोंदा पोलिसांचे कार्यक्षेत्र विभागून बेलवंडीमध्ये स्वतंत्र पोलीस स्थानक करण्यात आले. दोन्ही ठिकाणी पोलीस निरीक्षक यांच्याबरोबर पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचारी असले तरी तालुक्यातील 115 गावांचा भार पोलिसांवर असल्याने सर्वच ठिकाणी पोलीस यंत्रणा उपस्थित राहील, अशी व्यवस्था नसल्याने परिणामी अवैध व्यवसाय करणार्‍यांवर नियंत्रण मिळवताना पोलिसांना कसरत करावी लागते.

अवैध व्यावसायिकांवर प्रशासनाचा वचक नाही

शहरासह तालुक्यात असलेले ढाबे आणि हॉटेलमध्ये सर्रासपणे देशी आणि विदेशी दारू विक्री होत आहे. वाईन्स आणि परमीट रुम बियरबार हे थोडेच आहेत.त्यात मद्य पिण्याचा परवाने असलेले व्यक्ती तालुक्यात बोटावर मोजता येतील एवढेच असले तरी दारू पिणार्‍यांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत आहे.दारू पिऊन गाडी चालवणे ,अधिक दारूच्या आहारी गेलेले अनेकजण कुटुंबासह आसपासच्या परिसरात अशांतता पसरवत आहेत.यातच गुन्हेगारी वाढतअसल्याने या अवैध दारूचा व्यवसाय बंद होणार कसा? हा मोठा प्रश्न आहे.

दोन्ही नवीन अधिकार्‍यांचा धाक वाळू तस्करांनाच
जिल्ह्यात नव्याने आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक ,आणि जिल्हाधिकारी यांनी पदभार घेतल्यापासून तालुक्यातील बहुतांशी नद्यानाले, ओढे यातून उपसा होणारी अवैध वाळू मात्र सध्या बंद आहे .मात्र इतर अवैध व्यवसाय डोके वर काढत असल्याचे दिसतेय.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here