भिंत फोडून आठ क्विंटल कापसाची

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी

 पुणतांबा : येथील कोपरगाव रोडलगत असलेल्या कापूस खरेदी केंद्राच्या दुकानाची भिंत फोडून चोरटयांनी अंदाजे आठ क्विंटल कापसाची चोरी केली. त्यामुळे परिसरातील व्यापारी वर्गात खळबळ निर्माण झाली आहे.

पुणतांबा येथे कोपरगाव रोडलगत खाजगी व्यापाऱ्यांची चार – पाच कापूस खरेदी केंद्रे आहे. दिवाळी सण काही दिवसावर आलेला असल्यामुळे शेतकरी वर्गाकडून कापसाची वेचणी करून तो विक्री करण्याचे कामही वेगात आहे. गुणवत्ता बघून कापसाला ४८००ते ५००० रूपये क्विंटलपर्यंत भाव आहे.

कोपरगाव रोडलगत धनंजय ठुबे यांचे कापूस खरेदी केंद्र आहे. रविवारी रात्री चोरट्यांनी दुकानाच्या दाक्षिण बाजूला असलेल्या भिंतीला अंदाजे दोन फुट आकाराचे छिद्र पाडून त्यातून कापसाची चोरी केली विशेष म्हणजे पुणतांब्यात चोरी करतांना यापूर्वी पत्रा कापून चोरी केली जात होती. आता मात्र भिंतीला छिद्र पाडून चोरी करण्याचा फंडा वापरला आहे. चोरलेला कापूस अंदाजे ७० ते ८० फूट लांब डोक्यावर किंवा खांद्यावर ठेऊन पश्चिम दिशेला वाहून नेलेला प्रथमदर्शनी दिसून येते त्यानंतर चारचाकी वाहनात टाकून पोबारा केल्याचा संशय आहे. यात लहान मुलासह चार पाच चोरट्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे.

आत्ता पर्यंत एका ही चोरीचा तपास नाही पुणतांब्यात आतापर्यंत अनेक चोऱ्या झाल्या मात्र एकाही चोरीचा तपास लागलेला नाही. गावात अवैध धंधानी चांगलाच जम बसविला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये पोलीस खात्याबाबत तीव्र नाराजी आहे. घटनास्थळी पुणतांबा पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी भेट दिली असून तपास सुरु केला आहे. 

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here