कोविड १९ प्रोफेशनल प्रीमिअर लिग क्रिकेट स्पर्धा  


राष्ट्र सह्याद्री । प्रतिनिधी


श्रीरामपूर – शहरातील नागरिकांच्या आरोग्याकरिता गेल्या सात महिन्यांपासून झटणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कोरोना योध्यांसाठी श्रीरामपूर नगरपरिषदेच्यावतीने  कोविड १९ प्रोफेशनल प्रीमिअर लिग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. १ नोव्हेंबर रोजी पुर्णवाद नगर मैदान येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली.

श्रीरामपूर शहरातील नागरिकांच्या आरोग्याकरिता कोरोना व्हायरस विरूध्द अत्यावश्यक सेवेतील ज्या व्यक्ती, सामाजिक संस्था यांनी कार्य केले त्यांना माणसिक तणावातून मुक्त होणेकरीता या किर्केट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये श्रीरामपूर शहरातील डाॅक्टर ११, ॲडव्होकेट ११, केमीस्ट ११, गुड माॅर्निग ११, श्रीरामपूर नगर परिषद कर्मचारी ११ इत्यादी संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक श्रीरामपूर नगर परिषद कर्मचारी ११ या संघाने पटकावले व  त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच सचिन खरात, मॅन ऑफ द सीरीज अमर दाभाडे हे पुरस्कार देखील नगर परिषद कर्मचारी संघाने पटकावले.                    

या निमित्ताने नगर परिषद कर्मचारी संघाचे अभिनंदन श्रीरामपूर नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांचे हस्ते स्मृती चिन्ह देऊन करण्यात आले. याप्रसंगी  नगरसेवक श्री श्यामलीग शिदे, मुख्तार शहा, प्रकाश ढोकणे, रवि पाटील हे सर्व उपस्थित होते. विजयी संघात कर्णधार बंटी चव्हाण, सचिन खरात, लाखन दाभाडे, जय बागडे, अमर दाभाडे, जयराज बागडे, राकेश झिंगारे, प्रसाद चव्हाण, सचिन जेधे, जमील पठाण, राहुल दाभाडे, प्रसाद चव्हाण, चेतन बागडे, मयुर चव्हाण, रूपेश करोसिया इत्यादी खेळाडू सहभागी झाले होते. या  कार्यक्रम प्रसंगी दीपक चरणदादा चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here