श्रीशक्ती ग्रुपने नवरात्र उत्सवात जपली सामाजिक बांधिलकी; अनाथ मुलीचे घेतले पालकत्व

श्रीरामपूर : श्री शक्ती ग्रुपने नवरात्र उत्सवात सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवत अनोखा संदेश दिला आहे.
           याबाबत असे की, सौ.दिपाली करण ससाणे यांनी महिला व युवतींना एकत्रित करत ‘श्री शक्ती’ ग्रुप’ची’ स्थापना केली. श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार स्व.जयंतराव ससाणे व माजी नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे, यांच्या प्रेरणेतून श्रीशक्ती ग्रुपने श्रीरामपूर शहरात गेल्या चार वर्षापासून कार्य करत आहे.       

‘या’वर्षी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा देत अनाथ मुलगी दत्तक घेतली आहे. सदर मुलीची संपूर्ण जबाबदारी श्रीशक्ती ग्रुपने घेतली आहे. त्याबरोबरच श्रीरामपूर नगरपरिषदेच्या रुग्णवाहिके साठी ऑक्सिजन मशीन आणि ग्रामीण रुग्णालयात सुरु असलेल्या कोविड सेंटरला पन्नास स्टीमर मशीन देण्यात आले आहे.         

कोल्हापूर सांगलीचा महापूर असो किंवा रेनवॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम असो श्रीशक्ती ग्रुपने पुढाकार घेत सामाजिक बांधिलकी जपली आहे. श्रीशक्ती ग्रुपच्या वतीने दरवर्षी नवरात्र उत्सवाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येते. विशेष करुन युवती व महिला श्रीशक्ती ग्रुपच्या दांडियाची आतुरतेने वाट पाहत असता त्यामुळे कमी कालावधीत ग्रुपने आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.         

याकार्यात दिपाली ससाणे यांना मयूरा गांधी, पूजा नगरकर, स्मिता मुथा, निती ओगले,पूजा बलराज, माधुरी सोनवणे, भारती रासकर, पलक गुप्ता, कावेरी मांडणं, सोनाली महाले, प्रियंका जनवेजा, यशाली पाटणी, राणी  देसर्डा, आदींची मोलाची साथ लाभली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here