या अभिनेत्याच्या मुलीवरही बालवयातच झाला होता लैंगिक अत्याचार

मुलीने स्वतः केला खुलासा; पहा व्हिडीओ 

मुंबई: अभिनेता अमीर खानची मुलगी (Ira Amir Khan) इरा खानने एक खळबळजनक खुलासा व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर केला आहे.  १४ वर्षांची असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार झाले होते. असा खळबळजनक खुलासा तिने त्यात केला आहे. मानसिक आरोग्याबाबत ती संबंधित व्हिडिओत बोलताना दिसते.

सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी विविध प्रकारच्या पोस्ट करत असते. अलिकडेच तिने ‘जागतिक मानसिक स्वास्थ्य दिनाच्या निमित्ताने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ती देखील कधीकाळी नैराश्यामध्ये होती असं तिने या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. परंतु इतक्या श्रीमंत घरात जन्माला आलेली इरा नैराश्येमध्ये का होती? असा प्रश्न सर्वांनाच सतावत होता. त्या प्रश्नाचं उत्तर तिने दिलं आहे.

इराने एका इन्स्टाग्राम व्हिडीओजच्या माध्यमातून आपल्या ड्रिप्रेशनचं कारण सांगितलं. ती म्हणाली, “मी खूप लहान होते तेव्हा माझ्या पालकांचा घटस्फोट झाला. वरकरणी सर्व काही ठिक होतं. माझ्या आई-वडिलांमध्ये घटस्फोटानंतरही खूप छान मैत्रीचे संबंध होते. पालकांनी माझ्या सर्व इच्छा पुर्ण केल्या. परंतु त्या घटनेने माझ्या मनावर खुप खोलवर परिणाम केला होता. मी सहा वर्षांची होते त्यावेळी मला टीबी झाला होता. मी १४ वर्षांची होते तेव्हा माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले होते. अशा अनेक लहान लहान घटना घडत गेल्या ज्यांचा परिणाम माझ्या आयुष्यावर होत होता. मी मित्र-मंडळींसोबत बाहेर जाणं टाळायची. मी दिवसांतील बहुतांश वेळ केवळ झोपून काढायचे. हळूहळू मी गर्दीत असूनही स्वत:ला एकटी समजू लागले. परिणामी एक वेळी आली जेव्हा मी ड्रिप्रेशनमध्ये असल्याची जाणीव मला झाली.”

असा अनुभव इराने या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे तिने हा व्हिडीओ आपल्या युट्यूब चॅनेलवर हिंदी डबिंग करुनही अपलोड केला आहे.

पुढील लिंकवर क्लिक करुन तुम्ही तो व्हिडीओ पाहू शकता – 

https://www.youtube.com/watch?v=bJFGTy38pO8&ab_channel=IraKhan

3 COMMENTS

  1. I’ll immediately seize your rss as I can’t find your email subscription link or newsletter service. Do you’ve any? Please permit me understand so that I may subscribe. Thanks.

  2. Excellent site you have here but I was wondering if you knew of any community forums that cover the same topics talked about in this article? I’d really like to be a part of community where I can get suggestions from other experienced individuals that share the same interest. If you have any recommendations, please let me know. Kudos!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here