बचतगटाचे कर्ज माफ करा; काँग्रेसची मागणी !

   राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी 
नेवासा:  बचतगटाचे कर्ज माफ करा त्यासाठी सरकारी अनुदान द्या अशी मागणी महिला बचत गटाच्या प्रश्नांसाठी नेवासा तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. नेवासा काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन देण्यात आले आहे.
    या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की मागील सहा महिन्याच्या कोरोनाच्या संकटामुळे महिला बचत गटाचे सर्व कामे ठप्प होती. त्यामुळे कोणत्याही प्रकारची आर्थीक आवक नसल्याने  बचत गट धोक्यात आलेले असून अशा परिस्थितीमध्ये अनेक मायक्रो फायनान्सर बँका तसेच शासकिय बँका यांनी बचत गटांना हप्ते वसुलीसाठी जाचक अशी प्रकिया राबवन्याल सुरुवात केली आहे. तरी बचत गटांना दिलेले कर्ज हे माफ करुन त्यासाठी सरकारने अनुदानाची योग्य तरतुद करावी तसेच नव्याने बचत गट उभारणीसाठी शासनाने अनुदानाच्या स्वरुपात मदत जाहीर करावी अशी मागणी निवेदनात केली आहे. 

      निवेदन देतेवेळी काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वाघमारे,तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे,जिल्हा सेक्रेटरी सुदामराव कदम,सेवा दलाचे अरुण सरोदे आदी कॉग्रेस कार्यकर्त्या सह महिला बचत गटाच्या मनिषा उमाप, ताराबाई लबडे, आदी महिला यांच्या सह अनेक बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here