दोन वर्षांपासून फरार असलेल्या बलात्कारातील आरोपीला पोलिसांनी शिताफीने पकडले

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी

नेवासा : दोन वर्षांपासून फरार असलेल्या नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथील बलात्कारातील आरोपीला नेवासा पोलिसांनी सोमवारी शिताफीने पकडले.
    ११ जून २०१८ रोजी एका मुलीने तोफखाना पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादी वरून नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथील गुन्हयातील आरोपी मोहसीन बादशहा सय्यद हा गेल्या दोन वर्षांपासून अस्तित्व लपवून अटक चुकवीत होता. नेवासा पोलीस स्टेशनचे आयपीएस अधिकारी अभिनव त्यागी यांना सदर आरोपी त्याच्या गावी माळीचिंचोरा येथे घरी आला असल्याची खबर मिळाली. त्यानुसार नेवासा पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक ठाकूर,पोलीस उपनिरीक्षक शेवाळे,पोलीस हेड कॉन्स्टेबल तुळशीराम गीते, पो.कॉ.दहिफळे, कुदळे, गुंजाळ यांच्या पथकाने आरोपीस घरी जाऊन पोलीस स्टेशनला हजर केले व त्यानंतर तोफखाना पोलीसांच्या ताब्यात दिले.
    पोलीसांच्या या कामगिरी बद्दल पोलीस पथकातील पोलीस अधिकारी व पोलीसांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे. 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here