या परिसरात भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट; गस्तीची मागणी


राष्ट्र सह्याद्री/ प्रतिनिधी

वडाळा महादेव : तालुक्यातील वडाळा महादेव येथील अशोकनगर फाटा परिसरात रात्री अडीच ते साडे तीन दरम्यान, भुरट्या चोरांनी धुमाकूळ घालत चार ते पाच घरामध्ये सामानाची उचकापाचक करून सामानाची फेक झोक केली.

सुमारे रात्री अडीच ते साडेतीन दरम्यान परिसरामध्ये भुरट्या चोरांनी चोरी करण्याच्या उद्देशाने परिसरात प्रवेश केला. चार ते पाच ठिकाणी सामानाची उचकापाचक केली आहे. यामध्ये एका सर्वसामान्य कुटुंबातील किराणा व्यावसायिकाचे दुकान उचकटून त्यातील शेंगदाणे, शाबुदाना, गोडतेल अशा स्वरूपात वस्तू गायब केल्या आहे, तर काही ठिकाणी घरातील सामानाची फेक झोक केली होती.

यामध्ये काही नागरिकांना चोरांची चाहूल लागताच परिसरातील जागरुक नागरिकांनी मोबाईल द्वारे परिसरातील शेजारी नातेवाईक मित्र परिवार यांना फोनद्वारे माहिती देण्यास सुरुवात केली. त्यामुळे परिसरात चोर आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली नागरिक जागे झाले. परिसरात गोंधळ होताच सदर चोरांनी परिसरातून पळ काढला. याबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे कुठल्याही प्रकारची माहिती व तक्रार दाखल नसल्याचे सांगितले. याबाबत पोलिस प्रशासनाकडून दररोज परिसरात गस्त घालण्यासंदर्भात माहिती मिळाली आहे. तरी काही ठिकाणी लाईटच्या खांबावर ग्रामपंचायत प्रशासनाने लाईट बसून अंधार दूर करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here