एक हजार किलो गोमांस पकडले

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी

संगमनेर : गोवंश जनावरांची कत्तल करुन अवैधमार्गेने वाहतूक करणारा टेम्पो संगमनेर शहर पोलीसांनी पकडला व दोघांना अटक करून पोलिसांनी एक हजार किलो गोवंशाचे मांस व चार लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी पोलीस धनंजय महाले यांनी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली असून, शहर पोलिसांनी वाहनचालक शहनवाज मोहम्मद हुसेन (वय 20) व इसतीयक अहमद कुरेशी (वय 25, दोघेही रा.कुर्ला, मुंबई) या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गोवंश मांस वाहतूक करणारा तीन लाख रुपये किंमतीचा टेम्पो क्र.एम.एच.03/सी.व्ही.7922, व एक लाख 20 हजार रुपये किंमतीचे एक हजार किलो गोवंशाचे मांस असा एकूण चार लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

काल मध्यरात्रीच्या सुमारास संगमनेर शहरातील एका  कत्तलखान्यांतुन गोवंशाची कत्तल करुन ते मास एका टेम्पोतून मुंबईकडे घेऊन जात असल्याची माहिती शहर पोलिसांना समजली. त्यानुसार पोलिसांनी पुणे-नाशिक महामार्गावरील सायखिंडी फाटा येथे सापळा लावून संशयित वाहन पकडले.या वाहनाची तपासणी केली असता त्यात एक हजार किलो गोवंशाचे मांस पोलिसांना आढळले. पोलिसांनी तातडीने टेम्पोसह मांस ताब्यात घेऊन दोघांना अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here