घरघंटी गिरणी चालकावर कारवाई होणार?

श्रीरामपुर : आज घरोघरी घरघंटी व्यवसायिक दिसतात, कोरोना काळात तर गृहिणीना दळणा साठी हाच पर्याय उपलब्ध होता. पण अशा घरगूती गिरण्या मूळे पीठ गिरणी कर्मचाऱ्यांना तोटा सहन करावा लागतो आहे. म्हणूनच घरगुती घरघंटी गिरणी चालकावर कारवाई करा अन्यथा, श्रीरामपूर तालुक्यातील गिरणी चालक वीजबिले भरणार नाहीत, असा इशारा महावितरणला  निरंतर सेवा पीठगिरणी कामगार महासंघाच्या वतीने देण्यात आला.                           

  श्रीरामपूर तालुका पीठगिरणी संघटनेची पंचायत समिती हनुमान मंदिर येथे दोन नोव्हेंबर रोजी बैठक पार पडली. 
   यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निरंतर पीठगिरणी सेवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर बागुल हे होते. तर, या कार्यक्रमास निरंतन पीठ गिरणी कामगार महासंघाचे राज्य सचिव अशोक सोनवणे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष बाळासाहेब घोडे यासह तालुक्यातील पीठगिरणी चालक व मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
    यावेळी निरंतर पीठगिरणी  राज्य सचिव अशोक सोनवणे यांचेकडे पीठगिरणी चालक व मालकांनी घरगुती ‘घरघंटी’ चालक हे महावितरणची वीजचोरी करून कमी भावात दळण दळतात. त्यामुळे पीठगिरणी चालकावर उपासमारीची व व्यवसाय बंद पडण्याची वेळ आली आहे. असा तक्रारींचा पाढा वाचण्यात आला.

यावेळी राज्य निरंतर पीठगिरणी सेवा महासंघ यांच्या वतीने श्रीरामपूर तालुका महावितरण कार्यालयात कनिष्ठ अभियंता श्रीरामपूर डिव्हिजन ए.ए.साठे यांचेकडे घरघंटी चालकांवर कारवाई करण्यात यावी अन्यथा तालुक्यातील पीठ गिरणी चालक इथून पुढे वीज बिले भरणार नाहीत,असा लेखी निवेदन देण्यात आले. यापूर्वी दोन वेळेस श्रीरामपूर महावितरण कार्यालय उपकार्यकारी अभियंता यांना घरगुती घरघंटी चालकांवर कारवाई करावी असे निवेदन देण्यात आले.

मात्र त्यावर अद्याप महावितरणने कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे महावितरण कंपनी यांनी या घरघंटी चालकांवर कारवाई करावी, असे लेखी निवेदन श्रीरामपूर तालुका पीठगिरणी चालक-मालक संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.

1 COMMENT

  1. The quality of the wig piece is very good. No one can tell that it is a wig after putting it on. The wig is really good. The store also gave a lot of small gifts. If needed, they will repurchase. The hair quality is very good.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here