या परिसरात महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडला

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी

राहुरी : राहुरी तालूक्यातील कुक्कडवेढे येथे दिनांक ३ नोव्हेंबर रोजी गंगाबाई चव्हाण या ४२ वर्षीय महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला. या घटनेने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून पतीनेच खून केल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून समजली आहे.          राहुरी तालूक्यातील वांबोरी परिसरात असलेल्या कुक्कडवेढे येथे मयत गंगाबाई बद्री चव्हाण ही ४२ वर्षीय महिला पाच ते सहा दिवसांपूर्वी तिचा पती बद्री चव्हाण व त्यांचा मुलगा ऊस तोडणीसाठी आले होते. ते मुळचे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील रहिवाशी आहेत.

ऊस तोडणी कामगार म्हणून ते कुक्कडवेढे येथे आले होते. या घटनेतील आरोपी बद्री फुला चव्हाण हा व्यसनाधीन होता. दिनांक २ नोव्हेंबर रोजी रात्री बद्री चव्हाण याने त्याच्या पत्नीकडे पैशाची मागणी केली. मात्र तिने पैसे दिले नाही. याच गोष्टीचा राग आल्याने दोघांमध्ये भांडण झाले. आरोपी बद्री चव्हाण वय वर्ष ५५ याने त्याची पत्नी गंगाबाई हिला ओढत घरा बाहेर नेले आणि दगड तिच्या डोक्यात मारला. अशी माहिती मयत गंगाबाई हिच्या मुलाने दिली आहे.        

दिनांक ३ नोव्हेंबर रोजी सकाळी कुक्कढवेढे परिसरातील उजव्या कालव्याच्या बाजूला सदर ऊस तोडणी कामगार महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत दिसून आला. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर येथील उप विभागीय पोलीस अधीक्षक संदीप मिटके, आयपीएस अधिकारी नोपानी, राहुरी पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बागूल, उप निरीक्षक निरज बोकिल, हवालदार आजीनाथ पाखरे, प्रभाकर शिरसाठ, संतोष राठोड, पालवे, रवींद्र मेढे, सुनील शिंदे आदि पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.

आरोपी बद्री फुला चव्हाण वय ५५ वर्षे याला ताबडतोब ताब्यात घेऊन गजाआड केले आहे. या घटने बाबत मयत महिलेच्या मुलाच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here