पत्नी व प्रियकराच्या छळास कंटाळून पतीची आत्महत्या आरोपींना

  राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी

दौंड: पत्नी व प्रियकराने छळ करून पतीच्या मृत्यूस  कारणीभूत ठरल्याचा आरोपा वरून मयता ची  पत्नी व तिचा प्रियकर या दोघांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होऊन दहा दिवस होऊनही यवत पोलिसांना अद्याप आरोपी सापडलेले नाहीत.

याबाबत माहिती अशी, निलेश महादेव खळदकर वय 35 रा, टाकेमाळ, नांनगाव ता, दौंड असे मयताचे नाव आहे, 
निलेश महादेव खळदकर हे त्यांचे पत्नी धनश्री आणि दोन मुलासह रहात असून त्यांचे कडे सुनील जगताप यांनी धनश्री हिस गुरू बहीण मानल्याने त्याचे धनश्रीकडे येणे जाणे व बोलणे होत असे.
गुरू बहीण मानल्याने निलेश खळदकर हे त्यांचे बोलण्याकडे दुर्लक्ष करीत असे.  ऑक्टोबर 2019 मध्ये निलेश यास दिवानवर धनश्रीचा मोबाईल सापडला, हा मोबाईल चेक केला असता त्याला पत्नी धनश्री व सुनील जगताप याचे अनैतिक संबंध असल्याची खात्री झाली. त्याने ही बाब आपले भाऊ दीपक खळदकर आणि आई यांना सांगितली. मात्र याविषयी धनश्रीला काहीही न बोलता शांत राहिला.


दि, 13/11/2019 रोजी सकाळी 11,धनश्री हिने पतीं निलेश यास मोबाईलवरून जेवायला कधी येणार असे विचारले, यावर निलेश याने मी नगरला गेलो आहे, सायंकाळी 5 नंतर येतील असे खोटेच सांगितले. नंतर निलेश दुपारी 12: 30 वाजता घरी आल्यावर घराचे दार आतून लावल्याचे दिसून आले व आतून धनश्री व एक पुरुषाचा आवाज येत होता. हाका मारूनही दार न उघडल्याने शेवटी धक्के देऊन दरवाजा उघडून आत गेल्यावर आत धनश्री व सुनील जगताप नको त्या अवस्थेत दिसले. नंतर जगताप पळून गेला व धनश्री माहेरी निघून गेली, निलेश खळदकर हे आपल्या दोन लहान मुलांसह भाऊ दिपककडे राहू लागले. यानंतर निलेशच मनस्वास्थ बिघडले. तो व्यसनाधीन झाल्याने त्यास पुणे येथे व्यसन मुक्ती केंद्रात दोनवेळा ठेवले होते.

दरम्यान धनश्री व सुनील हे निलेश यास मानसिक त्रास देत होते. सतत मानसिक त्रास दिल्याने निलेश याने आपल्या मृत्यूस धनश्री व सुनील जगताप हेच जबाबदार आहेत. असे चिठीत लिहून आत्महत्या केली. यानंतर मयत निलेशचा भाऊ दिपक  महादेव खळदकर यांनी यवत पोलिसात तक्रार दाखल केली. यावरून धनश्री व सुनील जगताप हे निलेश याचे मृत्यूस कारणीभूत असल्यावरून त्यांचेवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास स,पो,नि, कापरे हे करीत आहेत.
गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक झाली नाही. याबाबत स.पो.नि. कापरे याना विचारले असता ते मिळून येत नाही.असे उत्तर देऊन कापरे यांनी अधिक बोलण्याचे टाळले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here