गणेश कुंज येथील सदनिकाधारकाचा  जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी

सातारा: गणेश कुंज सोसायटी गट नंबर 1319 /1 शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा येथील बिल्डर आनंद गायकवाड व राठी यांनी बेकायदेशीर,अनधिकृत बांधकाम केले. या बाबत कोर्ट आदेशने स्थगिती दिली असताना ही संबंधितांवर आज अखेर कारवाई होत नाही. व सदनिका धारकांना न्याय मिळत नाही. म्हणून गणेश कुंज सोसायटीचे मुख्य प्रवर्तक संतोष मोहिते यांनी आज 3 नोव्हेंबर  रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास  जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा  येथे अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

वेळीच पोलिसांनी त्यांना रोखले म्हणून मोठा   अनर्थ टळला. तातडीने संतोष मोहिते यांना  सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करून वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
 

काय आहे गणेश कुंज सोसायटी प्रकरण

बिल्डर गायकवाड व राठी यांनी सुधारित मंजूर बांधकाम आराखड्यामध्ये शासनाची व सदनिकाधारकांची वेळोवेळी फसवणूक केली आहे. असे सदनिका धारक मोहिते व इतरांचे म्हणणे आहे. याबाबत सदनिकाधारकांनी शासनाकडे तक्रारी, निवेदने, देऊनही त्या बिल्डरवर कारवाई होत नाही. पर्यायाने सदनिकाधारकांना न्याय मिळत नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून ते आत्मदहन करत असल्याचे सदनिका धारक संतोष मोहिते यांनी सांगितले.

मोहिते यांनी आत्मदहन करण्याबाबत प्रशासनास पूर्वसूचना निवेदन पत्रात असे म्हटले होते की, सदर बिल्डरवर बेकायदेशीर बांधकाम करणे बाबत कारवाई होत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here