एकनाथ खडसे यांनी दिला गिरीश महाजन यांना मोठा धक्का!

जामनेर : नुकताच एकनाथ खडसे यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. नाथाभाऊ बरोबर कोणीही जाणार नाही, असा दावा करणारे गिरीश महाजन यांना खूप मोठा धक्का बसला आहे. महाजन यांच्या जामनेर तालुक्यातील पिंपरी आणि नेरी बुद्रुक येथील त्यांच्या 201 भाजप कार्यकर्त्यांनी नाथा भाऊंच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आगामी काळात भाजप कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाचें कार्यक्रम असेच सुरू राहतील असेही कार्यक्रमादरम्यान बोलताना एकनाथ खडसे म्हणाले.

अनेक भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी नाथाभाऊ सोबत कोणीच नाही असा विश्वास व्यक्त केला होता, परंतु दिवाळीनंतर जळगाव येथील प्रवेश सोहळा घेऊन या लोकांना दाखवून देऊ कि आता नाथाभाऊ सोबत कोण आहे.

सामान्य कार्यकर्त्यांमधून उद्याचे नेते घडत असतात म्हणूनच पक्ष संघटनांसाठी प्रवेश करणारा प्रत्येक कार्यकर्ता महत्त्वाचा असतो. या कार्यकर्त्यांमुळे पक्ष बळकट होऊन त्यातून उद्याचा नेता घडत असतो.

मुक्ताईनगर येथील झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे सुरत येथील उद्योजक आबा पाटील आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील म्हणाले, जामनेर तालुक्यातील ही सुरुवात आहे अनेक भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छुक असून आगामी काळात जामनेर तालुका राष्ट्रवादीमय करून टाक. या कार्यक्रमास अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here