जमिनीच्या वादातून  अंगावर  ट्रँक्टर ; चुलतभावाचा मृत्यू

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी

नारायणगाव : सावरगाव येथील एकनाथ वाडी येथे सख्या दोन चुलत भावात जमिनीचा व ट्रॅक्टरच्या भाड्याचा वाद विकोपाला गेला. त्या रागाने सख्ख्या चुलत भावाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून ठार  करण्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी जुन्नर तालुक्यातील सावरगाव येथे घडला.     

या घटनेत प्रकाश नामदेव  मनसुक वय 58 हे गंभीर जखमी झाले. जुन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
एकनाथवाडी सावरगाव तालुका जुन्नर येथे जमिनीच्या वादातून व ट्रॅक्टरच्या भाड्याच्या वादातून जयनाथ सोपान मनसुख याने त्यांचा चुलत भाऊ प्रकाश मनसुख यांच्या अंगावर सोमवारी  दुपारच्या  सुमारास ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. गावातील मुख्य चौकात हा प्रकार घडल्याने संपूर्ण गावात खळबळ उडाली .
    या घटनेनंतर प्रकाश मनसुख यांना जुन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु  उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात  नेले होते,मध्यरात्री साडेबाराच्या दरम्यान त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला . या गुन्ह्यातील आरोपीस अटक केली आहे. तसेच गुन्ह्यातील वापरलेला ट्रॅक्टर  ताब्यात घेण्यात आला .आरोपीला न्यायालयात हजर केले असता .6 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here