कांद्याला कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचे रास्ता रोको

राष्ट्र सह्याद्री

श्रीरामपूर : श्रीरामपूर येथील बाजार समितीत कांद्याला अपेक्षेपेक्षा कमी भाव मिळाल्याने येथिल कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समिती समोर रास्ता रोको करून आंदोलन केले.


कांद्याला 5 हजार भाव मिळणं अपेक्षित असताना लिलावात अवघा 3500 रुपये भाव मिळाल्याने श्रीरामपूर बाजार समितीचे कांदा लिलाव बंद पाडत शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीरामपूरच्या गेटबाहेर श्रीरामपूर-नेवासा रोडवर तब्बल १ ते २ तास रास्ता रोको आंदोलन केले.

यानंतर पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांच्या माध्यस्तीने हे आंदोलन स्थगित करण्यात आले, असून मोजक्या शेतकऱ्यांना घेऊन नायब तहसीलदार यांच्या सह बाजारसमिती सोबत एक बैठक घेण्यात आली आणि त्यानुसार झालेल्या सर्व कांद्याचे पुन्हा लिलाव करण्याचे या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यानंतर बाजार समितीमध्ये लिलाव पुर्ववत करण्यात आले.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here