केंद्रीय मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा ५८ वा वर्धापनदिन साजरा

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी

पुणे : केंद्रीय मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा ५८ वा वर्धापनदिन सोमवारी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिलिंद वाकोडे, संस्थेचे सहसंचालक श्रीधर प्रसाद राव यांच्या हस्ते करण्यात
आले. यावेळी संस्थेच्या माजी उपसंचालिका डॉ. डेसी थॉमस, सहसंचालक सुनिल पोकरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमात सहसंचालक सुनिल पोकरे म्हणाले की,`सर्वप्रथम महाबळेश्वर येथे १९५२ साली मधुमक्षिका पालन संशोधन केंद्र सुरू करण्यात आले होते.
मधमाशीपालन उद्योगाचा प्रचार व प्रसार होण्याच्या उद्देशाने त्यावेळचे खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे पहिले अध्यक्ष वैकुठभाई मेहता यांच्या पुढाकाराने एक
नोव्हेबर १९६२ रोजी पुण्यात स्थापन करण्यात आले होते. ही संस्था अखिल भारतीय स्तरावर कार्य करण्याकरिता पुण्यामध्ये विविध ठिकाणी आगरकर संस्था,
होमगार्ड संस्था, शंकरशेठ रस्ता येथे विखुरलेल्या अवस्थेत होते. केंद्रीय मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे विद्यापीठ रस्ता येथे एक नोव्हेबर १९८४ पासून
स्वतंत्र जागेत स्थंलातरीत झाले आहे.
केंद्रीय मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महत्व अधिक आहे. शेतकऱ्यांना युवकांना व वनवासी युवकांना, महिलांना मधमाशीपालनाचे प्रशिक्षण व माहिती
देऊन या संस्थेच्या माध्यमातून प्रचार व प्रसार केला जात आहे. गेल्या काही वर्षापासून मधमाशीपालनाकडे शेतकऱ्यांचा पाहण्याचा दृष्टीकोन बदलेला आहे. त्यामुळे
संस्थेत प्रशिक्षणाकरिता मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील वर्षी जवळपास दीड हजार प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देण्यात
आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आर.बी कणसे यांनी आभार मानले.LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here