सुप्यामधे तरुणीवर अत्याचार; एकास अटक तर चारजण फरार 

राष्ट्र सह्याद्री  / प्रतिनिधी
पारनेर :  पारनेर तालुक्यामधील सुप्यामधील उच्च शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय तरुणीस लग्नाचे अमिष दाखवत,तिला गुंगीचे औषध टाकलेली बियर पाजुन वारंवार तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधामास व त्याला साथ देणाऱ्या चार जणांविरुध सुपा पोलिस ठाण्यात बलात्कार, अनुसूचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच इतर कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याप्रकरणी आरोपी शुभम अनिल चव्हाण यास अटक करण्यात आली असुन,त्याला साथ देणारे सुप्यातील स्वप्निल घुले,अंकुश मगर पप्पू पवार, विकास पोटे हे चौघे फरार झाले आहेत . 
सुपे येथील १३वी मध्ये शिक्षण घेणार्‍या महाविद्यालयीन तरुणीचे गावातील शुभम अनिल चव्हान या तरुणाशी प्रेमसंबंध जुळले होते.या प्रेमसंबंधाबद्दल त्यांच्या घराच्या लोकांना समजल्यावर २ जुलै २०२० रोजी सुपे पोलिस ठाण्यात दोन्ही कुंटुबातील सदस्य गेले .तेथेही शुभम चव्हाण याने माझे पिडीत तरुणीशी प्रेमसबंध असुन दोघे आम्ही लग्न करणार असल्याचे सांगितलं. पोलिस अधिकार्‍यां समोर तसे लेखी दिल्यानंतर त्याच दिवशी शुभम पिडीतेस कारेगाव ता.शिरुर जिल्हा पुणे येथे घेऊन गेला. त्याचे मित्र विकास पोटे व अंकुश मगर  यांनी कारेगाव येथे त्याला खोली घेऊन देण्यात मदत केली.
कारेगाव येथे गेल्यावर आरोपी शुभम हा पिडीतेस दररोज काम करण्यासाठी पाठवत असे. रात्रीच्या वेळी तो रोज दारु पिऊन यायचा आणि पिडीतेस मारहाण करायचा. बियरमध्ये गुंगीचे औषध टाकून ते तिला पिण्यास भाग पाडत असे. बळजबरीने सिगारेट पिण्यास लावायचा. कारेगाव मधील सदर काॅलनीमधे मारहाणीचा आवाज जावू नये म्हणून बाथरुमध्ये नेऊन तिला मारहाण करीत असे. मला तुझ्यासोबत रहायचे नाही, तु मला सोडून दे, तु जीव दिला तर मी आडचणीत येईल असे सांगत मारहाण करायचा. शुभमची आई तसेच चुलतीही याच कारणावरुण आपणास मारहाण करीत असायठे असे पिडीत तरुणी सोशल मिडीयावर व्हायलर केलेल्या व्हिडीओ क्लिपमधे सांगत आहे .
 याबाबत सुपे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीमध्ये दि.२ जुलै २०२० ते २९ आॅक्टोबर २०२०  दरम्यान आरोपी शुभम चव्हाण याने फिर्यादी हि मागासवर्गीय आहे असे माहीत असतानाही तिला लग्नाचे अमिष  दाखवून तिच्याशी वेळोवेळी जबरी संभोग करून फिर्यादीस शिविगाळ दमदाटी करून तिला गोळ्या देऊन लग्नाला नकार दिला.तुझ्या घरच्याना मारील आशी धमकी  दिली तसेच अंकुश मगर, पप्पु पवार, स्वप्नील घुले,विकास पोटे सर्व राहणार सुपे यांच्या गुन्हा दाखल केला आहे. अरोपींपैकी शुभम चव्हाण यास शनिवारी सांयकाळी अटक करण्यात आली असुन,इतर चार आरोपी फरार आहे .

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here