शेतकऱ्यांची दुचाकी आणि कापसाच्या गोण्या चोरीला :, गुन्हा

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी

उक्कलगाव : पुणतांबा कापूस चोरीची घटना ताजी असताना आणखीन एक अशीच घटना घडली आहे. उक्कलगावात अज्ञात चोरट्यांनी कापसाने भरलेल्या चार गोण्या रात्रीचे वेळी चोरून नेले आहे. त्यामुळे कापूस चोरणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे जाणवत आहे.

तालुक्यातील उक्कलगाव परिसरात राहणारे शेतकरी शरद थोरात यांची बजाज डिस्कवर दुचाकी नंबर एम एच (17 एसटी 74 67 ), तसेच कापसाने भरलेल्या चार गोण्या रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या, या’प्रकरणी’ शरद एकनाथ थोरात या शेतकऱ्यांने श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध भां. द. वि. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी भापोसे आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक राशिनकर हे दुचाकी व कापूस चोरट्याचा शोध घेत आहे. अश्या रात्रीवेळी कापूस चोरीच्या घटना वाढल्याने उक्कलगावसह गळनिंब परिसरातील शेतकर्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली.

3 COMMENTS

Leave a Reply to Azbbhm Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here