पुलाची उंची लक्षात न घेतल्याने शेवगांव गेवराई राज्य मार्ग पाण्याखाली

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी
 बोधेगाव :      शेवगांव – गेवराई राज्यमार्गावरील बोधेगाव येथील डाकबंगला- मारुती वस्ती दरम्यान आसलेल्या लाल्या ओढ्यावर २०१५ /१६ साली  जलसंधारण योजनेतुन बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली होती मात्र त्यावेळी राज्य मार्गावरील पुलाची उंची लक्षात न घेता याची निर्मिती करण्यात आल्याने सदरील ओढ्याचा पुल गेल्या तीन आठवड्यापासून पाण्याखाली होता. २१ दिवसापासून वाहनधारकांना  करावी लागत होती कसरत. वाहतूकीतील आडचणी लक्षात घेता, सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या पाण्याचे नियोजन करत त्याला वाट करून देण्यात आली. 
 गेल्या ११ ऑक्टो रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने बोधेगाव सह परिसरात पाणीच पाणी करून टाकले होते. २२७ मिमी इतक्या पावसाची नोंद झालेल्या पावसामुळे सगळेच पुल पाण्याखाली गेले होते.  मात्र कालांतराने पाऊस उघडल्याने शेवगांव गेवराई राज्य मार्गावरील काही पुल वाहतुकीला खुले झाले.  परंतु मारुती वस्ती नजिक असलेल्या ओढ्यावरील पुल मात्र गेल्या तीन आठवड्यापासून पाण्याखाली होता.
सततच्या पाण्याने या पुलाची खडी वर येउन मोठाले खड्डे  पडले असल्याने वाहतूकीला याचा आडसर निर्माण होत होता. जलसंधारणाच्या माध्यमातून २०१५/१६ साली शेवगांव गेवराई राज्यमार्गावरील नाल्या ओढ्याच्या पुलाची उंची त्याकाळी लक्षात न घेता  यावर बंधारा टाकण्यात आला होता मात्र त्याचा थोप थेट राज्यामार्गावर आल्याने याठिकाणची वाहतूक कोलमडली होती. 
दरम्यान सततच्या पाण्याने पडलेल्या खड्ड्यातुन दुचाकी, तीन चाकी, चार चाकी याना जीव मुठीत धरून चलावे लागत होते. तर केदारेश्वर सह साखर कारखाना चालु झाल्याने उसाचे ट्रक, ट्रॅक्टर, उसाचे टायर, जुगाड याना तर खुपच त्रास सहन कराव लागत होता, दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागांने तात्काळ यावरती उपाययोजना करत बंधाऱ्यातील पाणी कमी करून वाहतुकीला मोकळीक करून देण्यात आली. 

जलसंधारणेच्या बंधाऱ्यामुळे वाहतुकीला अडथळा    
“जलसंधारणेच्या चुकीच्या बंधाऱ्यामुळे आतापर्यंत या रस्त्यावरील वाहतुकिला आडथळा निर्माण झाला होता, दरम्यान बंधाऱ्याचे फुगवट्याचे पाणी रस्त्यावर येत आल्याने बंधाऱ्यातील पाणी सायफन पद्धतीने कमी करत रस्त्यावरील पाणी कमी केले आहे आणि येत्या दोन दिवसात रोडवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्याचे काम केले जाईल.”
उमेश केकान – कनिष्ठ सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग शेवगांव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here