हवेत गोळीबार; बांधकाम ठेकेदाराचे अपहरण करण्याचा प्रयत्न

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी
औरंगाबाद : हवेत फायरिंग करीत एका बांधकाम ठेकेदाराचे कारमधून चौघांनी अपहरण केल्याची थरारक घटना देवानगरी भागातील पीडब्ल्यूडी कॉलनीत बुधवारी (दि.४) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. ठेकेदाराचे अपहरण करून बीड बायपास रोडने जात असतांना भालगावजवळ कार बंद पडल्याने अपहरणकर्त्यांनी नदीम पठाण, राउफ पठाण यांच्या पायावर गोळी मारून त्यांना जखमी अवस्थेत कारसह सोडून अपहरणकर्ते पसार झाले. चिकलठाणा पोलिसांनी जखमी अवस्थेत नदीम पठाण यांना उपचारासाठी घाटीत दाखल केले.
नदीम पठाण हे बांधकाम ठेकेदार असून त्यांनी देवानगरीतील पीडब्ल्यूडी कॉलनीतील बँक अधिकारी मदन अवधूत भोसले यांच्या घराच्या बांधकामाचा ठेका घेतला आहे. जानेवारी महिन्यापासून तिथे बांधकाम सुरू आहे.

औरंगाबादेत भरदिवसा घडली थरारक घटना
नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी नदीम कामागरासह बांधकामाच्या ठिकाणी होते. सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास एक पांढऱ्या रंगाची इंडिगो कार क्रमांक (एमएच-१४-सीके-५७३५) मधून तीन ते चार जण तिथे आले. त्यापैकी एकाने नदीम पठाण यांच्याशी हात मिळवला. थोड्यावेळ बोलत उभे असताना त्यातील एकाने हवेत गोळीबार केला.
त्यानंतर नदीम पठाण यांना कारमध्ये ढकलून तेथून बीड बायपास रोडने पसार झाले. गोळी झाडल्याच्या आवाजाने आजूबाजूचे लोक घराबाहेर आले. बांधकामावरील मजूर शेख रशीद, शेख सुलेमान, अकिम शहा यांनी कारच्या दिशने धाव घेतली. मात्र, तोपर्यंत कार भरधाव निघून गेली. यावेळी एका दुचाकीवर मजुराने कारचा देवळाईपर्यंत पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पुढे त्याला कार दिसली नाही.
दरम्यान, बीड रोडवरील भालगावनजीक अपहरणकत्र्यांची कार अचानक बंद पडली. तेव्हा कारमधील अपहरणकत्र्यांनी नदीम पठाण यांच्या पायावर गोळी झाडून कार सोडून तेथून धूम ठोकली. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे, निशिकांत भुजबळ, सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

अपहरणकर्ते सीसीटीव्हीत कैद
बांधकामाच्या ठिकाणावरून नदीम पठाण यांचे अपहरण झाले. त्याच्या आजूबाजूच्या इमारतीत असलेल्या सीसीटीव्ही वॅâमेNयात अपहरणकर्ते कैद झाले आहेत. कार शिवाय काही जण दुचाकीवर दूर थांबलेले असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून सातारा पोलिसांसह गुन्हे शाखेचे कर्मचारी अपहरणकत्र्यांचा शोध घेत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here