रिपब्लिकन सेना बांधकाम कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी हाकानी शौकत धामनेकर, तर उपाध्यक्षपदी शिवाजी रामू कांबळे यांची एकमताने निवड

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी

चंदगड : तालुका रिपब्लिकन सेना बांधकाम कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी तूर्केवडी ता. चंदगड येथील सामाजिक कार्य करते,व बांधकाम क्षेत्रातील असंघटित कामगार यांचेकरिता अहोरात्र तळमळीने काम करणारे कामगार, हाकानी शौकत धामानेकर यांची, तर तड शिनहाल येथील सामाजिक व फुले,शाहू, आंबेडकरी चळवळीत धडाडीने काम करणारे निष्ठावंत भीमसैनिक श्री शिवाजी रामू कांबळे यांची उपाध्यक्षपदी नुकताच झालेल्या बांधकाम कामगार संघटनेच्या मेळाव्यात एकमताने निवड करण्यात आली. मौजे का र वे येथे हा मेळावा पार पडला. अध्यक्ष स्थानी रिपब्लिकन सेना युवानेते मारुतीराव कांबळे-का र वे कर होते.
मेळाव्याचे प्रास्ताविक व स्वागत बाळू कांबळे यांनी केले.

यावेळी प्रथम सन 2020-2021 साठी,जिल्हा उपाध्यक्ष मारुती गोविंद कांबले यांनी हकाणी शौकत धामनेक् र यांचे नाव अध्यक्ष पदासाठी सुचविले तर उपाध्यक्ष पदासाठी शिवाजी रामू कांबळे यांचे नाव बसवंत भोगण बे यांनी सुचविले यावेळी एकमताने टाळ्यांच्या गजरात यांची निवड करण्यात आली. याच मेळाव्यात सचिव पदाकरीता अभिषेक नाईक, तर संघटनेच्या संचालक पदी, बसवंत भोगन, बाळू कांबळे, नामदेव सुभेदार अरुण हलकरणीकर, संजय आडाव, बाळू नाईक. यांची निवड करण्यात आली.

यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून , मारुतीराव का र वे कर यांनी, बांधकाम कामगार नोंदणी नंतर मिळणाऱ्या सरकारी योजना ची माहिती दिली.व रिपब्लिकन सेना बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातून जास्तीतजास्त कामगारांची महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे करिता नूतन पदाधिकाऱ्यां नी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. शेवटी आभार बाळासाहेब माच्चेदा र यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here