दीपावलीच्या लक्ष्मी (केरसुनी )बनविणाऱ्या कारागिरांवर उपासमारीची वेळ     

  राष्ट्र सह्याद्री/ प्रतिनिधी
धनंजय वाकचौरे

राहता : दीपावली सणाच्या निमित्ताने प्रत्येकाच्या घरात लक्ष्मी म्हणून पूजेचा बहुमान असलेल्या शिराई(झाडू)  काळाच्या ओघात मागणी कमी झाल्याने शिराई बनविणाऱ्या कारागिरवर उपवास मारीची वेळ येऊन ठेपली आहे. तरी ही आपला पारंपरिक व्यवसाय ची नाळ जोपासत एकरुखे येथील, थोरात कुटूंबियानी हा व्यवसाय अखंड सुरू ठेवला आहे.

थोरात कुटुंबियांची आता ही त्याची तिसरी पिढी देखील हाच व्यवसाय करत आहे. त्यांना या व्यवसायात अनेक प्रकारच्या अडचणी ना सामोरे जावे लागत आहे. शिराई ही प्रामुख्याने शिंदी च्या झाडापासून बनवली जाते. या झाडाची परिसरात संख्या कमी असल्याने त्यांना इंदोर या ठिकाण्या हून माल आणावा लागत आहे. थोरात याच्या कुटूंबा मध्ये पाच ते सहा माणसांचे एक कुटुंबीय दिवसाला वीस ते पंचवीस शिराई बनवितात. याची विक्री करून साधारण 50 ते 70 रुपये ना एक विकली जाते.

या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबियांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहेसरकारने हा पारंपरिक व्यवसाय जपणाऱ्या हातासाठी आर्थिक मदत किंवा कर्ज योजना तयार करावी. ज्याने करून आशा गरीब कुटूंबा ची उन्नती होईल अशी अपेक्षा हे कामगार करत आहे.     

आजच्या डिजिटल युगात जाहिराती साठी वापरली जाणारी व्हाट्सॲप, फेसबुक  या सोशल  मध्यमा पासून देखील ते दूरच आहेत. तर किराणा व मॉल  यापासून तर लांबच आजही त्यांना परिसरातील गावात घरोघरी जाऊन लक्ष्मीचे विक्री  करावी लागते. त्यांचे प्रतिस्पर्धी नसलेले  परंतु आता प्रतिस्पर्धी बनलेले,  प्लास्टिक झाडू व फायबर च्या अती वापराने या शिराया केरसुनी बनवण्याचा हा पारंपारिक व्यवसाय हद्दपार होत असल्याने यांच्या वर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.
 

प्लास्टिकच्या वापराबरोबरच प्लास्टिक झाडूच्या वापरावर ही बंदी करावी. -शासनाने प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे. तसेच प्लास्टिक व फायबरच्या झाडू वर बंदी घालून हाताने बनवलेल्या झाडू ची सरकारी व निमसरकारी कार्यलयात हाताने बनवली झाडू ची सक्ती केल्यास आम्हाला पुन्हा एकदा सुगीचे दिवस आल्या शिवाय राहणार नाहीत. (शंकर थोरात, झाडू व्यवसायिक)

आपल्या निसर्गाने निर्माण होणाऱ्या गोष्टी चा वापर केल्यास त्यांचा आपल्या आरोग्य वर निश्चितच चांगला परिणाम होतो व प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम जगजाहीर आहेत. यामुळे भारतीय नागरिकांनी भारतीय संस्कृती चे जतन करुन आरोग्य ही जपण्यासाठी प्लॅस्टिक चा झाडू चा वापर न करता शिराईचा वापर करणे आवश्यक आहे–. डॉ संतोष मोकळ,एम.एस. राहाता

लक्ष्मी (शिराई) ला दीपावली सणाच्या दिवशी फार महत्त्व आहे. या सणाच्या दिवशी निसर्गाने दिलेल्या शिंदी च्या झाडापासून बनविल्या जाणाऱ्या झाडू चा वापर करावा तर प्लॅटिक झाडूला आपण हद्दपार करू.  -देवेंद्र भवर, ग्रामस्थ एकरुखे

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here