तालुक्यातील सर्वच कंपन्यांची दूरध्वनी सेवा विस्कळीत-

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी —

अकोले : तालुक्यातील सर्वच कंपन्यांची दुररध्वनी सेवा विस्कळीत झाली आहे. एयरटेल,व इतर कंपन्याचे नेटवर्क अकोलेत दिवस-दिवस राहत नसल्याने, ग्राहकांना संपर्काविना  मनस्ताप होत असल्याने तालुक्यात मोबाईल असून खोळंबा झाल्याची अवस्था अकोले करांची झाली आहे.     

तालुक्यात गेल्या काही महिन्यात मोबाईल नेटवर्क चा बोजवारा उडाला असुन ग्राहक मोठ्या प्रमाणात तक्रार करत आहे. कधी एअरटेल,तर कधी होडाफोन कंपनीच्या मोबाईलची रेंज टिकत नाही. जिओ कंपनीने सुरूवातीला चांगले नेटवर्क सुरू असताना जिओ चे ग्राहक वाढल्याने त्यांच्या मोबाईल रेंज चा स्पीड कमी झाला आहे. आयडिया व व्होडाफोन यांच्या सेवाबाबत न बोललेच बरे अशी प्रतिक्रिया ग्राहक देत आहे.तर  बी एस एन एल ची सेवा म्हणजे असून खोळंबा नसून अडचण अशी अवस्था झालेली आहे. एकीकडे केंद्र व राज्य  शासनाने सर्व पत्रव्यवहार,शालेय अभ्यास ऑनलाईन  केलेबँकिंग सेवेसह सर्व व्यवहार ऑनलाईन झालेत माञ या मोबाईल नेटवर्क कंपन्याच्या या गोंधळाने  विद्यार्थ्यी व नागरिकांचे  नुकसान होत आहे. 
 

शासनाने या मोबाईल रेंज बाबत योग्य ती उपाययोजना करावी,मोबाईल रेंज वाढविण्यासाठी प्रयत्न करून नागरिकांचे,विद्यार्थ्यांचे हाल वाचववावेत अशी अपेक्षा नागकरिकातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here