Police: पोलिस लाच घेताना सापडल्यास निरीक्षकांची कंट्रोल रूमला बदली..!

सहायक आयुक्त, निरीक्षकांवर पाेलिस आयुक्त भडकले

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

औरंगाबाद | मागील दोन महिन्यांत एसीबीच्या अधिकाऱ्यांनी शहर पोलिस दलातील चार कर्मचाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यामुळे पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता पोलिस निरीक्षकांसह सहायक आयुक्तांवर संतापले आहेत. ज्या पोलिस ठाण्यात पहिल्यांदा एसीबी ट्रॅप होईल त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल अन् दुसऱ्यांदा असा प्रकार घडल्यास पोलिस निरीक्षकांची बदली कंट्रोल रूममध्ये करण्यात येईल, अशी ताकीद डॉ. गुप्ता यांनी बुधवारी दिली.
सातारा पोलिस ठाण्यातील हवालदार भगवान जाधव एसीबी ट्रॅपमध्ये अडकल्याची माहिती मिळताच पोलिस आयुक्तांनी हे फर्मान काढले. निरीक्षक, सहायक आयुक्त हे हवालदार आणि सहायक पोलिस उपनिरीक्षकांच्या तपासाकडे लक्ष देत नाही, असे यावरून स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. सहायक पोलिस आयुक्तांनीही पोलिस ठाण्याच्या पाहणीदरम्यान या गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवावे, असे आदेश आयुक्तांनी दिले आहे. प्रलंबित गुन्ह्यांकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्या, तपासातील दिरंगाई आणि चार्चशीट पाठवण्यातील विलंब, केस डायरी लिहिण्यातील दिरंगाई गांभीर्याने घेतली जाईल. पोलिस उपायुक्तांनीही कागदपत्रांची सातत्याने तपासणी करावी, आदी सूचनाही डॉ. गुप्ता यांनी दिल्या आहेत.

6 COMMENTS

  1. What i don’t understood is actually how you are now not really much more well-appreciated than you might be right now. You’re so intelligent. You understand thus significantly in terms of this subject, made me for my part believe it from numerous numerous angles. Its like men and women are not fascinated until it¦s one thing to accomplish with Girl gaga! Your personal stuffs nice. Always maintain it up!

  2. I’m usually to blogging and i really admire your content. The article has really peaks my interest. I am going to bookmark your site and hold checking for brand new information.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here