नितीश कुमार यांची निवृत्तीची घोषणा

 आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगत केले भावनिक आवाहन

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार यांनी आपल्या राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. यंदाची बिहार विधानसभेची निवडणूक ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे त्यांनी जाहीर केले. जनतेने जेडीयूला मतदान करण्याचे आवाहन करताना त्यांनी विजयाचा दावाही केला.  
पुर्निया जिल्ह्यातील प्रचारादरम्यान नितीश कुमार यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. दरम्यान नितीश कुमार यांच्या प्रचारादरम्यान त्यांना अनेक निषेध आंदोलनांना सामोर जावं लागलं हे विशेष.
यावेळी त्यांनी ‘अंत भला, तो सब भला’ असा डायलॉगही मारला.राष्ट्रीय लोकसमाज पार्टीचे प्रमुख उपेंद्र खुशवाहा यांनी नितीश कुमार यांच्या निवृत्तीच्या घोषणेवर त्यांचे आभार मानले आहेत.
तसेच पार्टीचे नेते अजय कुमार यांना आशीर्वाद देऊन त्यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचा सल्ला दिला.नितीश कुमार यांनी अचानक केलेल्या निवृत्तीच्या घोषणेवर आश्चर्य व्यक्त करताना काँग्रेसनं म्हटलं की, “नितीश कुमार यांचं हे राजकीय विधान असू शकतं, ते आता मतांसाठी इमोशनल कार्ड खेळू पाहत आहेत.” काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मदम मोहन झा म्हणाले, “नितीश कुमार यांना आपण या निवडणूक हरणार असल्याचं जाणवत असल्यानेच त्यांनी अशी घोषणा केली आहे.” 
“मी कायमच नितीश कुमार यांनी निवृत्त व्हावं या मताचा होतो. आता त्यांनी निवृत्तीची घोषणा केलीच आहे तर त्यांनी जेडीयूतील मुख्यमंत्रीपदासाठीच्या नव्या चेहऱ्याची घोषणा करावी.”  
– अजय कुमार,  लोकजनशक्ती पार्टीचे नेते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here