भाजप नेते माजी खासदार संजय काकडे यांना पत्नीसह अटक आणि जामिनावर सुटका

राष्ट्र सह्याद्री / प्रतिनिधी
मुंबई :- मेव्हण्याला धमकावल्या प्रकरणी भाजपाचे माजी खासदार संजय काकडे आणि त्यांची पत्नी उषा काकडे चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर दोघांचीही न्यायालयाने जामिनावर सुटका केली.
काकडे यांचे मेव्हणे युवराज ढमाले (वय ४०) यांना गोळ्या घालून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात काकडे दाम्पत्यावर गुन्हा दाखल आहे.

याप्रकरणी ढमाले यांनी फिर्याद दिली आहे. चतुशृंगी पोलिसांनी काकडे दाम्पत्याला सकाळी अटक केल्यानंतर दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर न्यायालयात हजर केले असता दोघांचीही जामीनावर सुटका करण्यात आली.

फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. संजय काकडे आणि फिर्यादी यांच्यामध्ये सुरुवातीला भागीदारीत व्यवसाय होता. मात्र, त्यांच्यात मतभेद निर्माण झाल्यामुळे २०१० पासून दोघेही स्वतंत्ररीत्या व्यवसाय करतात. ऑगस्ट २०१८ मध्ये फिर्यादी संजय काकडे यांच्या घरी गेले असता काकडे यांनी ‘तुला संपवायला वेळ लागणार नाही, तू पैशाचा माज येऊ देऊ नकोस, तुला आणि तुझ्या कुटुंबाला सुपारी देऊन संपवेल’, अशा शब्दात फिर्यादी यांना धमकी दिली. त्यानुसार काही दिवसांपूर्वी काकडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.

4 COMMENTS

  1. Thanks for another fantastic post. Where else could anybody get that type of info in such a perfect way of writing? I have a presentation next week, and I’m on the look for such info.

  2. Hello there! I know this is kinda off topic however , I’d figured I’d ask. Would you be interested in exchanging links or maybe guest authoring a blog post or vice-versa? My website addresses a lot of the same topics as yours and I think we could greatly benefit from each other. If you might be interested feel free to send me an email. I look forward to hearing from you! Great blog by the way!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here