….. अन्यथा ॲट्रॉसिटी नाही !

सध्या ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करणाऱ्यांची संख्या वाढत चाललेली आहे. अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींबद्दल कोणी अपशब्द बोलले किंवा अपमानकारक वागणूक दिली असल्यास अशा पद्धतीचा गुन्हा दाखल केला जात असे. घरामध्ये तिथे आजूबाजूला कोणीही नसेल अशा वेळेस जर कोणी अपशब्द बोलले किंवा अपमानकारक वागणूक दिली असल्यास ॲट्रॉसिटी अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा ठरत नाही. असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एका सुनावणीदरम्यान दिला.

अनुसूचित जाती-जमातींच्या व्यक्तींबद्दल चार भिंतींआड अपमानास्पद वागणूक दिल्यास आणि तिथे अन्य एकही व्यक्ती उपस्थित नसल्यास तो अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा ठरत नाही, असा निर्वाळा देत या संदर्भातील गुन्हा सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला .

याचिकाकर्त्यांने एका महिलेला तिच्या इमारतीमध्ये शिवीगाळ केली होती. या प्रकरणी त्याच्याविरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणावर न्यायाधीश एल. नागेश्वर राव, न्या. हेमंत गुप्ता आणि अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली.

अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणारे, त्याचा अवमान करणारे, छळ करणारे कृत्य वा शेरेबाजी कोणत्याही ठिकाणी सर्वासमक्ष झाली असल्यास अशा प्रकरणांत अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा लागू होतो. मात्र, इमारतीच्या चार भिंतीआड कोणाच्या उपस्थितीविना केलेली अवमानकारक शेरेबाजी या कायद्यानुसार गुन्हा ठरत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here