या राज्यात शाळा भरली पण…

हैद्राबाद: कोरोना कमी झाला म्हणता म्हणता हळूहळू पाय पसरू पाहत आहे ,असाच काहीसा अंदाज या राज्यात मिळाला येथे शाळा सुरू झाली आणि कोरोना ची लागण वाढली.

आंध्र प्रदेशमध्ये नववी, दहावीच्या शाळा भरत आहेत. मात्र चारच दिवसात शाळा प्रत्यक्ष उघडल्यानंतर तब्बल २६२ विद्यार्थ्यांना आणि १६० शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. नववी आणि दहावी चे शिक्षण तांत्रिक दृष्ट्या ग्रामीण भागात मिळणे सोयीस्कर नव्हते त्यामुळे, आंध्र प्रदेशमध्ये २ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा प्रत्यक्ष भरण्यास सुरुवात झाली.

तेव्हापासून गेल्या तीन दिवसांत २६२ विद्यार्थ्यांना कोविड-१९ ची लागण झाली आहे. जितक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळांमध्ये उपस्थित राहात आहेत, त्या तुलनेत ही आकडेवारी फारच कमी आहे. तरीही कोविड-१९ सुरक्षेसंदर्भातील सर्व नियम काटेकोरपणे पाळले जात असल्याचे शालेय शिक्षण आयुक्त व्ही.चिन्ना वीरभद्रुदू यांनी सांगितले.

बुधवारी ४ नोव्हेंबर रोजी सुमारे ४ लाख विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थिती लावली. २६२ विद्यार्थ्यांना करोनाची बाधा झाली. मात्र, हे प्रमाण ०.१ टक्का इतकं देखील नाही. म्हणूनच ही मुलं शाळा उघडल्यामुळे बाधित झाली असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. प्रत्येक शाळेच्या वर्गात केवळ १५ ते १६ विद्यार्थ्यांनाच बसण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.

5 COMMENTS

  1. I will right away take hold of your rss as I can not in finding your email subscription hyperlink or newsletter service. Do you’ve any? Kindly permit me recognize in order that I could subscribe. Thanks.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here