आता व्हॉट्सअ‍ॅपवरूनही येणार पैसे पाठवता ; कशी असेल प्रक्रिया पाहुयात -….

मागील काही वर्षांपासून व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसे पाठवण्याची सुविधा सुरू होणार असल्याची चर्चा होती. अखेर प्रतीक्षा संपली आहे. WhatsApp UPI आधारित ही पेमेंट सेवा असून, यापूर्वीच तिची चाचणीही झालेली आहे.
“भारतात व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसे पाठवण्याची प्रात्यक्षिक झालं आहे आणि लोकही व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसे पाठवू शकतील. या सेवेबद्दल आम्ही उत्साही आहोत की, कंपनी भारतात डिजिटल पेमेंट करण्यातही योगदान देऊ शकेल.” फेसबुकचे इंडिया हेड अजित मोहन यांनी याविषयीची माहिती दिली. व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की,”आजपासून देशभरात व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पैसे पाठवता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून पैसे पाठवण्याचा अनुभव मेसेज पाठवण्या इतकाच सोप्पा असेल,” असा दावा कंपनीनं केला आहे.

अजून माहीती जाणून घ्या –
– भारतात व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट सेवा दहा प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे. जर वापरकर्त्याच्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये पेमेंटचा पर्याय असेल, तर त्याचा वापर करता येणार आहे. हा पर्याय नसेल तर व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करून हा पर्याय बघता येईल .
– व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटचा वापर करण्यासाठी वापरकर्त्याजवळ डेबिट कार्ड असणं अनिवार्य आहे. हे डेबिट कार्ड UPI ला सर्पोट करणार हवं. व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट पर्यायावर जाऊन बँकेची निवड करायची आहे. त्यानंतर माहिती भरून सेवा सुरू करायची आहे.
– व्हॉट्सअ‍ॅपने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्यानं UPI वर आधारित पेमेंट सिस्टिम तयार केली आहे.
– ICICI bank, HDFC bank, Axis bank, SBI आणि JIO Payments bank या पाच मोठ्या बँकांसोबतहीव्हॉट्सअ‍ॅपने करार केला आहे. पेमेंट सेवेसाठी यांचा समावेश आहे.
– इतकंच नाही, तर व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हॉट्सअ‍ॅपलाच पैसेच येणार नाही, तर UPI सिस्टीमला सपोर्ट करणाऱ्या कोणत्याही अ‍ॅपवर पैसे पाठवता येणार आहे. म्हणजे समोरची व्यक्ती व्हॉट्सअ‍ॅप पेमेंटचा वापर करत नसेल तरीही त्याला पैसे पाठवता येणार आहेत.
– व्हॉट्सअ‍ॅप म्हटल्याप्रमाणे पैसे पाठवणं सुरक्षित असणार आहे. कारण प्रत्येक व्यवहारासाठी UPI पिन अनिवार्य असणार आहे. WhatsApp payments अॅण्ड्राईड आणि आयओएस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे. त्यासाठी फक्त अ‍ॅप अपडेट करावं लागणार आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here