माजी मंत्री विनय कुलकर्णी हिंडलगा कारागृहात

राष्ट्र सह्याद्री। प्रतिनिधी

बेळगाव : धारवाड चे जिल्हा परिषद सदस्य योगेश गौडा यांच्या खून प्रकरणाशी संबंधित काँग्रेसचे माजी मंत्री आणि धारवाड येथील रहिवाशी विनय कुलकर्णी यांना सीबीआय पथकाने गुरुवारी ताब्यात घेतले आहे. तर सायंकाळी माजी मंत्री कुलकर्णी यांना बेळगाव येथील हिंडलगा कारागृहात न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

शुक्रवारी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे धारवाड येथील दुसऱ्या अतिरिक्त जिल्हा न्यायालयात या खटल्याची ऑनलाईन सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती पंचाक्षरी यांच्या समोर ही सुनावणी होणार असून यावेळी विनय कुलकर्णी यांचे पुढील भविष्य निर्धारित होणार आहे. दरम्यान योगेश गौडा खून प्रकरणात हात असल्याच्या संशयावरून सीबीआय’च्या पथकाने धारवाड येथील निवासस्थानातून काँग्रेसचे माजी मंत्री विनय कुलकर्णी यांना काल ताब्यात घेतले होते.

हिंडलगा कारागृहात रात्र काढावी लागली. माजी मंत्री कुलकर्णी यांना कारागृहात सामान्य कायद्याप्रमाणे वागणूक देण्यात आली असून शुक्रवारी त्यांचा 55 वा वाढदिवस आहे. त्यामुळे शुक्रवारी न्यायालयात त्यांना जामीन मिळतो की, हिंडलगा कारागृहातच त्यांना वाढदिवस साजरा करावा लागणार ! याची चर्चा जोरात सुरू आहे.

4 COMMENTS

  1. Hmm is anyone else having problems with the pictures on this blog loading? I’m trying to find out if its a problem on my end or if it’s the blog. Any suggestions would be greatly appreciated.

  2. Can I just say what a relief to search out somebody who truly is aware of what theyre talking about on the internet. You definitely know learn how to deliver a difficulty to gentle and make it important. More people have to read this and perceive this aspect of the story. I cant believe youre no more standard since you positively have the gift.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here