कोरोना फक्त मंदिरातच होतो का ?

 मनसे चा ठाकरे सरकारला सवाल बार सुरु केले, बार चालवण्याची वेळही वाढवून दिली. आता पिचर थिएटर, जलतरण तलाव चालू केले परंतु मंदिर उघडण्यावर अजून कसलाही निर्णय ठाकरे सरकारने घेतलेला नाही.
  पुनश्च हरि ओम  म्हणता आणि हरिलाच कोंडून ठेवता? मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी ठाकरे सरकारला हा प्रश्न विचारला आहे. मंदिरांच्या मुद्द्यावरुन मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. मनसेने मंदिरं कधी उघडणार यावरुन ठाकरे सरकारला पुन्हा एकदा प्रश्न विचारला आहे. बाळा नांदगावकर यांनी ट्विट करुन ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
राज्यात बार उघडले गेले, त्यानंतर जलतरण तलाव आणि मल्टिप्लेक्स यांनाही संमती देण्यात आली. करोना फक्त मंदिरातच होतो का? हा फक्त भावनेचा प्रश्न नाही तर मंदिरांवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांचाही  प्रश्न आहे असंही बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
  मनसे बाळा नांदगावकर यांनी ट्विट करुन ठाकरे सरकारवर मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरुन टीका केली आहे. मल्टिप्लेक्सलाही संमती देण्यात आली आहे. मग करोना फक्त मंदिरात असतो का?  या मागे या सरकारचा काय तर्क असावा हे एक कोडंच आहे असंही त्यांनी  म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here